teacher  sarkarnama
महाराष्ट्र

TET latest news : राज्य सरकार TET विरोधात पुनर्विचार याचिका दाखल करणार का? मंत्री पंकज भोयर यांनी दिली मोठी अपडेट

Maharashtra TET review petition News : प्रश्नोत्तराच्या तासात शनिवारी विधानपरषदेत यावर चर्चा झाली. त्यावेळी शालेय शिक्षणमंत्री पंकज भोयर यांनी पुनर्विचार याचिका दाखल करण्याबाबत मोठी अपडेट दिली आहे.

सरकारनामा ब्युरो

Nagpur News : सुप्रीम कोर्टाने देशभरातील इयत्ता पहिली ते आठवीच्याच्या शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा (TET) उत्तीर्ण होणे बंधनकारक केले आहे. यामुळे ज्या शिक्षकांची सेवा पाच वर्षांपेक्षा अधिक शिल्लक आहे, त्यांना दोन वर्षांच्या आत ही परीक्षा उत्तीर्ण करावी लागणार आहे. अन्यथा त्यांना सेवानिवृत्त व्हावे लागेल. या निर्णयामुळे लाखो शिक्षकांवर परिणाम होत आहे. त्यामुळे राज्यातील शिक्षक व शिक्षक संघटना आक्रमक झाल्या आहेत. याबाबत शिक्षकांनी रस्त्यावर उतरून 5 डिसेंबरला आंदोलन केले. त्याबाबत प्रश्नोत्तराच्या तासात शनिवारी विधानपरषदेत यावर चर्चा झाली. त्यावेळी शालेय शिक्षणमंत्री पंकज भोयर यांनी पुनर्विचार याचिका दाखल करण्याबाबत मोठी अपडेट दिली आहे.

राज्य सरकार TET विरोधात कोर्टात जाणार का ? वर्षांतून परीक्षा कितीवेळा? अभ्यासाला रजा मिळणार? का असा प्रश्न विधानपरिषदेत विचारण्यात आला होता. या प्रश्नाला उत्तर देताना शालेय शिक्षण मंत्री पंकज भोयर म्हणाले, 'सुप्रीम कोर्टाने देशभरातील शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा (TET) उत्तीर्ण होणे बंधनकारक करण्याचा आदेश दिला आहे. तरी देखील राज्य सरकारने शिक्षकांचे नुकसान होऊ नये म्हणून पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आपल्या विधी व न्याय विभागाने अशी याचिका दाखल करणे योग्य होणार नसल्याचा संदर्भ दिला होता, असे स्पष्ट केले.

त्यानंतर आता शिक्षकांच्या भावनाचा आदर करून इतर राज्याकडून दाखल करण्यात आलेल्या पुनर्विचार याचिकाच्या प्रति मागविण्यात आल्या आहेत. त्यानुसार शिक्षण विभाग इतर राज्यांनी याचिका दाखल केलेल्या याचिकाप्रमाणे विधी व न्याय विभागाला पुन्हा एकदा पुनर्विचार याचिका दाखल करण्यास सांगणार आहे. कुठल्याही शिक्षकांचे यामध्ये नुकसान होणार नाही, याची काळजी घेत सर्वसमावेशक याचिका दाखल करण्याचा प्रयत्न असणार असल्याचे मंत्री भोयर (Pankaj Bhoyar) यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, यापूर्वी सुप्रीम कोर्टाच्या टीईटीबाबतच्या निकालावर पुनर्विचार याचिका दाखल करता येत नसल्याची माहिती राज्य सरकारच्या विधी व न्याय विभागाने दिली होती. यावरून शिक्षक वर्गात संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, शनिवारी विधानपरिषदेत प्रश्नोउत्तराच्या तासावेळी शिक्षक आमदार म्हात्रे यांनी विचारलेल्या प्रश्नावर मंत्री भोयर यांनी पुनर्विचार याचिका दाखल करणार असल्याचे स्पष्टच उत्तर दिले. त्यामुळे राज्यातील शिक्षक वर्गाला दिलासा लाभला आहे.

त्यासोबतच यावेळी अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांनी सुप्रीम कोर्टाच्या टीईटीबाबतच्या निकालावर पुनर्विचार याचिका दाखल करता येत नसल्याची माहिती राज्य सरकारच्या विधी व न्याय विभागाने दिली होती. त्याबाबतचा अहवाल आपण विधिमंडळाच्या पटलावर ठेवणार का? असा प्रश्न विचारला होता. त्याला उत्तर देताना मंत्री भोयर म्हणाले, निश्चितपणे हा अहवाल सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT