Mahayuti crisis : महायुतीचा पेच सुटणार? अमित शहांच्या भेटीनंतर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चव्हाण-शिंदे बैठकीकडे राज्याचे लक्ष!

Amit Shah visit News : आगामी काळात होता असलेला महापालिका निवडणुकीचा शिवधनुष्य पेलण्यासाठी महायुती एकत्रित असणे गरजेचे असल्याचे लक्षात येताच पुन्हा एकदा महायुतीची तयारी सुरु झाली आहे.
amit Shah, eknath shinde, ravindra chavan
amit Shah, eknath shinde, ravindra chavanSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : राज्यात नुकत्याच झालेल्या नगरपालिका व नगरपंचायतीच्या निवडणुकीत महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना व अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी पडल्याचे चित्र दिसत होते. या निवडणुकीच्या निमित्ताने प्रथमच महायुतीमधील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आल्याचे दिसत आहे. यावेळी तीनही घटक पक्षाच्या नेत्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केल्याने राजकीय वातावरण तापले होते. त्याबाबत भाजप हायकमांडकडे निरोपही गेला आहे. मात्र, आगामी काळात होता असलेला महापालिका निवडणुकीचा शिवधनुष्य पेलण्यासाठी महायुती एकत्रित असणे गरजेचे असल्याचे लक्षात येताच पुन्हा एकदा महायुतीची तयारी सुरु झाली आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिल्लीत बुधवारी रात्री केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यानंतर गुरुवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास नागपूरमध्ये चव्हाण यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde ) यांच्यासोबत महायुतीबाबत बैठक होणार आहे. त्यामुळे सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे. या बैठकीत मुंबई, ठाण्यासह राज्यातील महत्त्वाच्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये शिवसेना आणि भाजप एकत्र लढणार असून याबाबत दोघांमध्ये चर्चा होणार आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

amit Shah, eknath shinde, ravindra chavan
BJP Politics : निवडणूक पार पडताच भाजपमध्ये अंतर्गत धुसफूस, जिल्हाध्यक्षांचा 'लेटरबॉम्ब'; मेघना बोर्डीकरांना घ्यावा लागणार मोठा निर्णय

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपने गेल्या सहा महिन्यापासून तयारी केली आहे. कोणत्याही परिस्थितीत त्यांना गेली 25 वर्ष एकसंध शिवसेनकडे (Shivsena) असलेल्या महापालिकेवर झेंडा फडकावयाचा आहे. त्यामुळे जोरदार तयारी सुरु आहे. त्यामुळेच येत्या काळात ही निवडणूक जिंकण्यासाठी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेलासॊबत घेण्याची रणनीती भाजपने आखली आहे. त्यामुळेच नगरपालिका निवडणुका संपल्यानंतर भाजपने दोन पावले मागे घेत शिवसेनेसोबत सुळवूण घेण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहेत.

amit Shah, eknath shinde, ravindra chavan
Sanjay Shirsat Rajendra Janjaal dispute: शिरसाट-जंजाळ वादावर शिंदेंचा 'मास्टरस्ट्रोक'! मध्यस्थी करत 'असा' काढला तोडगा...

दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भाजपचे नेते रवींद्र चव्हाण यांनी बुधवारी रात्री उशिरा भेट घेतली. यावेळी मुंबई महापलिकेसह महत्ववपूर्ण असलेल्या इतर महापालिकेतील जागावाटपाबाबत चर्चा झाली आहे. त्यानंतर आता रवींद्र चव्हाण व एकनाथ शिंदे यांच्यात जागावाटपाबाबत बोलणी होणार आहे. त्यामुळे या बैठकींनंतर मुंबईसह कोणत्या महापालिकेत युती होणार हे समजणार असल्याने सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे.

amit Shah, eknath shinde, ravindra chavan
Cash bomb shivsena Minister video : महेंद्र दळवीनंतर शिंदे सेनेच्या मंत्र्यावर कॅशबॉम्ब! चित्रलेखा पाटील यांनी थेट व्हिडिओच आणला समोर... आता काय होणार?

रवींद्र चव्हाण व एकनाथ शिंदे या दोन्ही नेत्यांच्या बैठकीत मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबीवली या महानगर पालिकेबाबत काय चर्चा होणार ? याकडे लक्ष लागले आहे. येत्या काळात राज्यात जिल्हा परिषद आणि महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. अद्याप या निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या नसल्या तरी हालचाली सुरु झाल्या आहेत. या निवडणुकांच्या अनुषंगाने रविंद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा होणार आहे.

amit Shah, eknath shinde, ravindra chavan
Raj- uddhav Thackeray : चहाच्या टेबलावर ठरणार 'ठाकरे-मनसे' युतीची गणितं, जागावाटपाचा तिढा सुटणार?

या दोन बड्या नेत्यांमधील बैठकीवेळी अनेक महत्वपूर्ण विषयावर चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये काही लक्षवेधी निर्णय घेतले जाणार आहेत. यावेळी महायुतीतील युतीधर्मावर स्पष्ट भूमिका घेतली जाण्याची शक्यता आहे. घटक पक्षांमधील नेत्यांना 'नो एन्ट्री' देण्यासारखे मोठे धोरणात्मक निर्णय घेतले जाऊ शकतात. त्यामुळे या बैठकीला महत्व प्राप्त झाले आहे. या बैठकीत घेतल्या जाणाऱ्या निर्णयाचे दूरगामी परिणाम होणार आहेत.

amit Shah, eknath shinde, ravindra chavan
Pune NCP Alliance : शरद पवारांच्या सूचनेनंतर पुण्यातील तंटा मिटवण्यासाठी प्रदेशाध्यक्ष मैदानात उतरणार

या दोन नेत्यांमध्ये होत असलेल्या बैठकीत घेण्यात आलेला कोणताही निर्णय राज्यातील सत्तासमीकरणावर थेट परिणाम करणारा असणार आहे. विशेषतः युती करण्याचे ठरल्यानंतर वादग्रस्त वक्तव्य व बंडखोरी करता येणार नसल्याने या सर्व निर्णयाकडे लक्ष असणार आहे. त्यामुळे आतापासूनच राजकीय वर्तुळाचे याकडे लक्ष लागलेले आहे.

amit Shah, eknath shinde, ravindra chavan
Pathardi Politics : आमदार राजळेंच्या खेळीनं राष्ट्रवादीला हादरा; लढाईपूर्वीच अजितदादांच्या उमेदवाराची माघार

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com