Teachers MLC Elections Maharashtra 2026 Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra MLC Election 2026 : महायुतीत बिनसलं! विधान परिषदेच्या तीन मतदारसंघातील वाद सुटेना, नेत्यांत खडाजंगी! बंडखोरीमुळे अंतर्गत मतभेद उघड

Mahayuti rebellion latest News : नागपूर, अमरावती, पुणे शिक्षक मतदारसंघावरून महायुतीतील तानातानीचा प्रयत्न इतर ठिकाणी होऊ नये यासाठी राज्य पातळीवरील नेते करत असले तरी स्थानिक पातळीवर युतीमध्ये गोंधळ सुरू आहे.

Sachin Waghmare

Mumbai news : राज्यातील विधान परिषदेच्या पाच जागेसाठी २३ ऑक्टोबरला मतदान होणार असल्याने राजकारण चांगलेच तापले आहे. महायुतीकडून जोरदार प्रचार केला जात आहे. मात्र, सर्वच मतदारसंघात महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली असल्याने अंतर्गत मतभेद उघड झाले आहेत. त्यातूनच पाच पैकी तीन मतदारसंघात जोरदार रस्सीखेच दिसत आहे. जागावाटपात भाजपच्या वाट्याला पाच पैकी तीन जागा आल्या आहेत तर एकनाथ शिंदे यांची शिवसेना व अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला एक-एक जागेवर समाधान मानावे लागले आहे. मात्र, सध्या अमरावती शिक्षक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघात मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली आहे. त्यामुळे तीनही पक्षातील नेत्यांत यानिमित्ताने जोरदार खडाजंगी पहावयास मिळत आहे.

विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने तीन मतदारसंघात वेगवेगळा वाद पहावयास मिळत आहे. नागपूर, अमरावती, पुणे शिक्षक मतदारसंघावरून महायुतीतील तानातानीचा प्रयत्न इतर ठिकाणी होऊ नये यासाठी राज्य पातळीवरील नेते करत असले तरी स्थानिक पातळीवर युतीमध्ये गोंधळ सुरू आहे.

अमरावती शिक्षक मतदारसंघात शिवसेनेच्या (Shivsena) अधिकृत उमेदवाराविरुद्ध युतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीकडून बंडखोराला पाठबळ दिले जात असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांची शिवसेना मराठवाडा पदवीधर मतदारसंघामध्ये सतीश चव्हाण यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. तर शिवसेनेचे नेतेमंडळी सतीश चव्हाण आमचे उमेदवार नाहीत, असे सांगतील असा इशारा मंत्री उदय सामंत यांनी दिला आहे.

अमरावतीमध्ये अजित पवार यांच्या पक्षाचे नेते शिवसेनेच्या उमेदवारांचे काम करत नसल्याच्या तक्रारी केल्या जात आहेत. त्याचा परिणाम मराठवाडा पदवीधर मतदारसंघामधील त्यांचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्यावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच राष्ट्रवादीचे सर्व नेतेमंडळी अमरावतीमध्ये शिवसेनेचे काम करतील, असे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले आहे.

भाजपने (BJP) अमरावती शिक्षक मतदारसंघातील बंडखोरांवर कारवाई केली आहे. तीन जणांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. दुसरीकडे मात्र शिवसेनेने त्यांच्या बंडखोरांवर कारवाई केली नाही. त्यामुळे शिवसेनेने कारवाई करायला हवी अशी मागणी माजी आमदार अनिल भोंडे यांनी केली आहे. त्यामुळे एकंदरीतच मतदानाला आठ दिवसांचा कालावधी असतानाच वातावरण तापले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT