Ambadas Danve : शेतकर्‍यांना पाच हजार, अन् म्हणे दिवाळी गोड करा; ठाकरेंच्या नेत्याकडून यादी देत 'हे' आणून दाखवा म्हणत सरकारच्या मंत्र्यांना दिले आव्हान!

Maharashtra Drought Relief News : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी पाच हजार रुपये अग्रिम रक्कम देण्याची घोषणा केली. यातून शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, असा दावाही सरकारकडून केला जात आहे.
Shivsena Leader Ambadas Danve Criticise BJP-CM Devendra Fadnavis News
Shivsena Leader Ambadas Danve Criticise BJP-CM Devendra Fadnavis NewsSarkarnama
Published on: 
Updated on: 

Marathwada Drought : मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात दुष्काळ असल्याचे सरकारनेच मान्य केले आहे. शेतकऱ्यांना तातडीची मदत देणे अपेक्षित असताना पंचनामे, नुकसानीचे फोटो, बँक पासबुक, आधार हे सगळे सोपस्कार पार पाडणे सुरूच आहे. केंद्राचे पथक येऊन मराठवाड्यात पाहणी करून गेले, पण त्यांची मदत दिवाळीपूर्वी मिळेल अशी अपेक्षा नाही.

राज्य सरकारने देखील ते मान्य केले. मग अशावेळी सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्याला थेट भरीव आर्थिक मदत करत त्यांची दिवाळी गोड करावी, अशी अपेक्षा बाळगणे गैर आहे का? असा सवाल विरोधक करत आहेत. बुधवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी पाच हजार रुपये अग्रिम रक्कम देण्याची घोषणा केली. यातून शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, असा दावाही सरकारकडून केला जात आहे.

मात्र, या मदतीवर आता टीका होऊ लागली आहे. पाच हजार रुपयात दिवाळी कशी साजरी करणार? याचे मार्गदर्शन सरकारनेच करावे, अशी टीका उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांनी केली होती. त्यानंतर याच पक्षाचे दुसरे नेते आमदार अंबादास दानवे यांनी सरकारच्या या मदतीची खिल्ली उडवली आहे.

Shivsena Leader Ambadas Danve Criticise BJP-CM Devendra Fadnavis News
Bhiwandi Politics: भिवंडीत मोठी राजकीय उलथापालथ! भाजप आमदाराच्या निकटवर्तीयाशी हातमिळवणी; 'सपा'च्या 6 नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी

दानवे यांनी दिवाळीत खरेदी कराव्या लागणाऱ्या ९ वस्तूंची एक यादी समाज माध्यमावर देत सरकारमधील मंत्र्यांना आम्ही शिवसैनिक पाच हजार रुपये देतो, त्यात त्यांनी या वस्तू आणून दाखवाव्यात असे आव्हान दिले आहे. जर पाच हजारात संबंधित मंत्री हे सगळं खरेदी करून आणू शकला तर त्याला एक हजार रूपये बक्षिस देखील देऊ, असे अंबादास दानवे यांनी म्हटले आहे.

Shivsena Leader Ambadas Danve Criticise BJP-CM Devendra Fadnavis News
Shivsena News : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का, नगराध्यक्षांसह अख्खी नगरपंचायतच एकनाथ शिंदेंच्या गळाला!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगीतल त्या मंत्र्याच्या खात्यावर आम्ही शिवसैनिक ५,००० रुपये जमा करतो. मंत्री महोदयांनी दिवाळीत..

​१. घरचा किराणा

२. मुलांचे कपडे (किंवा मुलांसाठी ड्रेस)

३. घराची सारवासारव

४. थोडाफार रंग

५. एक किलो मिठाई

६. दिव्यांसाठी लिटरभर तेल

७. २ लवंगी फटाक्यांची पाकिटे

८. बहिणीची ओवाळणी

९. बायकोसाठी साडी

Shivsena Leader Ambadas Danve Criticise BJP-CM Devendra Fadnavis News
Shivsena News : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का, नगराध्यक्षांसह अख्खी नगरपंचायतच एकनाथ शिंदेंच्या गळाला!

​हे सर्व याच पाच हजारात करून/आणून दाखवावे; त्याला मी आणखी एक हजार रुपयांचे अतिरिक्त बक्षीस देईन! ​काय 'भोपळाछाप' सरकार आहे! हे पैसे अंतिम मदतीतून कापून घेऊ नका म्हणजे झालं, असा टोलाही अंबादास दानवे यांनी आपल्या पोस्टच्या माध्यमातून सरकारला लगावला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com