NCP News : सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. परभणीचे जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे देशमुख हे राष्ट्रवादीची साथ सोडल्यानंतर थेट शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. या विषयीचे वृत्त 'ईसकाळ'ने सुत्रांच्या हवाल्याने दिले आहे.
प्रताप देशमुख हे अजित पवारांचे विश्वासू नेते म्हणून समजले जात होते. राष्ट्रवादीकडून परभणीचे पहिले महापौर होण्याची संधी देखील त्यांना मिळाली होती. मात्र, त्यांनी अचानक वैयक्तिक कारण सांगत आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंचा पक्षातील नेते फोडल्यानंतर आता त्यांचे लक्ष हे मित्रपक्षातील नेत्यांकडे आहे, असे बोलले जात आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत परभणीवरील दावा राष्ट्रवादी काँग्रेसने सोडला होता. आणि रायगडची जागा घेतली होती. त्यामुळे परभणीमधील राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये नाराजी होती. संख्याबळ अधिक असून देखील त्यांना शिंदेंच्या उमेदवाराला पाठींबा द्यावा लागला.
एकनाथ शिंदेंनी मराठवाड्यात आपले संघटन मजबुत करण्यावर भर दिला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेतील फुटलेल्या सहा खासदारांपैकी दोन खासदार हे मराठवाड्यातील आहेत. परभणीमधून त्यांचा विधान परिषदेचा उमेदवार देखील आता विजयी झाला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून अर्थमंत्रिपदासाठी आग्रह धरला असल्याची माहिती आहे. अजित पवारांच्या निधनानंतर हे पद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देण्यात आले होते. दरम्यान, पावसाळी अधिवेशनानंतर हे पद राष्ट्रवादीला देण्यात येईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रवादीकडून दिलीप वळसे पाटील यांना हे पद मिळेल, अशी चर्चा आहे. मात्र, या विषयी आपल्याला काही माहिती नसल्याचे स्पष्टीकरण वळसे पाटील यांनी दिले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.