Ajit Pawar, Devendra Fadnavis, Eknath Shinde Sarkarnama
महाराष्ट्र

BJP Big Victory : भाजपच्या विजयाचा धुरळा बसण्याआधीच कॅबिनेटच्या बैठकीला उपमुख्यमंत्री शिंदे, पवारांची दांडी; नाराजीनाट्य की अजून काही...!

Political News : राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोघेजण गैरहजर होते. त्यामुळे हे दोघेजण नाराज असल्याची चर्चा रंगली आहे.

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : राज्यात 29 महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने घवघवीत यश मिळवले. भाजप व महायुतीने 29 पैकी 22 महापालिका ताब्यात ठेवल्या आहेत. त्यामुळे या यशामुळे एकीकडे भाजपकडून राज्यभर मोठा जल्लोष केला जात असतानाच दुसरीकडे मात्र महायुतीमधील घटक पक्षात नाराजी असल्याचे पुढे आले आहे. शनिवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोघेजण गैरहजर होते. त्यामुळे हे दोघेजण नाराज असल्याची चर्चा रंगली आहे.

भाजपने मुंबई व ठाण्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत युती केली होती. मात्र, अन्य ठिकाणी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत व अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती केली नव्हती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मतविभागणी करीत भाजपने 29 पैकी 22 महापालिकात यश मिळवले आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना त्यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे वगळता अन्य ठिकाणी भाजपसोबत जाण्याचा फायदा झाला नाही. विशेष म्हणजे कल्याण-डोंबिवली, छत्रपती संभाजीनगर या महापालिकेतील सत्ता भाजपकडे गेली असल्याने एकनाथ शिंदे नाराज असल्याचे समजते. या नाराजीतूनच त्यांनी कॅबिनेट बैठकीला दांडी मारली आहे.

मुंबई महापालिकेत भाजपने एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेच्या मदतीने बहुमत मिळवले आहे. मात्र, बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष असल्याने महापौर पदाची संधी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला देण्यात यावी अशी मागणी करीत वाट पेटवली आहे. त्यातच दुसरीकडे शिवसेनेने त्यांचे मुंबईत निवडून आलेले 29 नगरसेवक एका हॉटेलवर ठेवले आहेत. त्यामुळे या मागे समीकरण काय? याचा अंदाज घेतला जात आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने त्यांची बार्गेनींग पॉवर वाढविण्याच्या उद्देशाने ही खेळी खेळी असल्याची चर्चा रंगली आहे.

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला (Congress) महापालिका निवडणुकीत मोठे अपयश आले आहे. पुणे व पिंपरी महापालिकेत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाऊनही मोठे यश मिळाले नाही. या 2017 सालापूर्वी पिंपरी व पुणे महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. मात्र, या दोन्ही ठिकाणच्या बालेकिल्ल्यात मोठे अपयश आले आहे. त्यामुळे अजितदादांची मोठी पीछेहाट झाली आहे.

या सर्व कारणामुळे संपूर्ण निवडणुकीत अजित पवार एकाकी पडल्याचे चित्र होते. तर दुसरीकडे अजित पवार यांनी भाजपवर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप केले आहेत. त्यामुळे महापालिका निवडणूक आरोप-प्रत्यारोपामुळे चांगलीच गाजली होती. अजित पवार विरुद्ध केंद्रीयमंत्री मुरलीधर मोहोळ, चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण असा वाद पाहवयास मिळाला. या सर्व प्रकारामुळे अजित पवार नाराज झाले आहेत.

त्यांच्या पक्षाला मनावे तसे यश मिळाले नाही. त्यामुळे अजितदादा नाराज असल्याचे समजते. त्याचमुळे त्यांनी बारामती येथून पत्रकार परिषद घेत पराभवामुळे खचून न जाता काम करण्याचा सल्ला कार्यकर्त्यांना दिला आहे. त्यासोबतच आगामी काळात होत असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूका दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्रित लढण्याचा निर्णय घेतला आहे.

या सर्व प्रकरामुळे शनिवारी होत असलेल्या कॅबिनेटच्या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दांडी मारल्याचे पुढे आले आहे. एकीकडे भाजपकडून विजयाचा जल्लोष सुरु असला तरी त्याचा धुरळा बसण्याआधीच कॅबिनेटच्या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची दांडी मारत नाराजी व्यक्त केली असल्याची चर्चा रंगली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT