Bjp Flag  Sarkarnama
महाराष्ट्र

Rajya Sabha election: राज्यसभेसाठी भाजपचे धक्कातंत्र! शिवसेना, राष्ट्रवादीतून 'ही' नावे चर्चेत

Rajya Sabha 2026 Maharashtra News : भाजपच्या वाट्याला राज्यसभेच्या चार जागा येणार आहेत. या चार जागांसाठी भाजपकडून धक्कातंत्र वापरले जाणार आहे. या चार जागांसाठी माजी मंत्री विनोद तावडे यांच्यासह या 3 नावांची चर्चा आहे.

सरकारनामा ब्युरो

Mumabi News : राज्यातील राज्यसभेच्या 7 जागा 2 एप्रिलला रिक्त होणार आहेत. या 7 जागांसाठीचा निवडणूक कार्यक्रमाची घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे. त्यामुळे राज्यातील घडामोडीना वेग आला आहे. विधानसभेतील संख्याबळ पाहता महायुतीला सहा तर महाविकास आघाडीच्या वाट्याला एकच जागा येण्याची शक्यता आहे. सात पेक्षा जास्त उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले तर निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यातच भाजपच्या वाट्याला राज्यसभेच्या चार जागा येणार आहेत. या चार जागांसाठी भाजपकडून धक्कातंत्र वापरले जाणार आहे. या चार जागांसाठी माजी मंत्री विनोद तावडे यांच्यासह या 3 नावांची चर्चा आहे. त्यामुळे उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपला (BJP) एक, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला एक तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला एक जागा मिळणार आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या तीन जागा कमी होणार आहेत. त्यामुळे यावेलेस भाजपच्या वाट्याच्या जागासाठी जोरदार रस्सीखेच पाहवयास मिळत आहे. राज्यसभेच्या 37 जागांसाठी 16 मार्च रोजी मतदान होणार आहे. यंदा दोन टप्प्यात होणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात, 2 एप्रिल रोजी निवृत्त होणाऱ्यांपैकी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह राज्यातील सर्वाधिक सात जागा रिकाम्या होणार आहेत.

भाजप जुन्या नियमानुसार एका खासदाराला पुन्हा राज्यसभेवर संधी देत नाही, हा पूर्वानुभव असल्याने केंद्रीय मंत्री रामदास आठवले वगळता माजी मंत्री भागवत कराड व धैर्यशील पाटील यांना पुन्हा संधी दिली जाणार का याबाबात उत्सुकता लागली आहे. तर दुसरीकडे भाजपच्या वाट्याच्या या चार जागेसाठी आता राज्यसभा उमेदवार देताना भाजप धक्कातंत्राचा अवलंब करण्याची शक्यता आहे. भाजपमध्ये सध्या विनोद तावडे (Vinod Tawade) , विनय सहस्रबुद्धे , सुनील देवधर यांच्या नावांची चर्चा आहे. धैर्यशील पाटील हे पोटनिवडणुकीत राज्यसभेवर गेल्याने त्यांना पुन्हा संधी मिळू शकते. याशिवाय भाजपच्या कोट्यातून रामदास आठवले यांना पुन्हा राज्यसभेवर पाठवले जाऊ शकते. आठवले हे केंद्रात मंत्री असल्याने त्यांना पुन्हा संधी दिली जाणार आहे.

त्यासोबतच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला एक जागा येणार आहे. यासाठी माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या नावाची चर्चा आहे. त्यासोबतच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला एक जागा येणार असल्याने पार्थ पवार यांचे नाव पुढे येण्याची शक्यता आहे. त्यामुळे जवळपास या रिक्त होत असलेल्या या जागांवर या नेतेमंडळींच्या नावाची चर्चा आहे.

राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा तोटा होणार आहे. फक्त एका जागेवर त्यांना आपला उमेदवार निवडून आणता येणार आहे. या स्थितीत तीन पक्ष मिळून या एकमेव जागेवरून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व उद्धव ठाकरे यांची शिवसेना हे तीन पक्ष राज्यसभेवर कोणाला संधी देणार, याची उत्सुकता आहे. महाविकास आघाडीकडील एका जागेसाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नाव आघाडीवर आहे.

दरम्यान, कार्यकाळ संपत असलेल्या महाराष्ट्रातील खासदारांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार, फौजिया खान भाजपचे रामदास आठवले, भागवत कराड, धैर्यशील पाटील, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी, काँग्रेसच्या रजनी पाटील यांच्या नावाचा समावेश आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT