

रायगड जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालानंतर शिंदेंच्या शिवसेनेला सत्तेबाहेर जावे लागू शकते, अशी चर्चा सुरू आहे.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी आणि भाजप युतीची शक्यता असून त्यात ठाकरे यांच्या शिवसेनेचाही सहभाग असू शकतो.
सुनील तटकरे यांच्या सूचक वक्तव्यामुळे ‘चंद्रपूर पॅटर्न’ रायगडमध्ये राबवला जाणार का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
raigad zp politics : जिल्हा परिषद निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर रायगड जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याचे संकेत मिळत आहेत. सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या शिंदेंच्या शिवसेनेवर सत्तेबाहेर जाण्याची वेळ आली असून अजितदादांची राष्ट्रवादी आणि भाजपची युती होण्याची शक्यता आहे. तर या युतीत आता ठाकरेंची शिवसेना असणार असून रायगडमध्ये ‘चंद्रपूर पॅटर्न’ची चर्चा होवू लागली आहे. तर ही चर्चा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिलेल्या सूचक वक्तव्यामुळे होत असून भाजपच्या युतीच्या घोषणेमुळे या चर्चांना अधिक वेग आला आहे.
भरत गोगावले आणि सुनील तटकरे यांच्यातील संघर्षामुळे चर्चेत असलेल्या रायगड जिल्हा परिषद निवडणूक आणि पंचायत समितीचा निकाल नुकताच लागला. या निवडणुकीत महायुतीने वर्चस्व राखत ठाकरे गट आणि काँग्रेससह शेकापचा सुपडा साफ केला. मात्र आता सत्ता संघर्ष सुरू झाला असून भाजप राष्ट्रवादी युती झाल्याचे समोर येत आहे. यामुळे शिंदेंच्या शिवसेना चांगलीच कोंडी झाली असून सत्तेत मात्र ठाकरेंची शिवसेना जाण्याच्या तयारीत आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वाधिक जागा या शिंदेंच्या शिवसेनेने जिंकल्या असून सेनेचे २१ सदस्य आहेत. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे १६, भाजपचे १५, ठाकरेंच्या शिवसेनेचे ५ आणि काँग्रेसचे २ सदस्य निवडून आहेत. जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापनेसाठी ३० सदस्यांच्या बहूमताची आवश्यकता आहे. या बहूमताच्या जवळ शिंदेंची शिवसेना असून त्यांना ९ सदस्यांचा पाठिंबा लागणार आहे. पण ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस त्यांच्याबरोबर जाण्याची शक्यता नाही.
उलट राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिलेल्या सूचक वक्तव्यामुळे ठाकरेंची शिवसेना भाजप राष्ट्रवादी युतीबरोबर घरोबा करण्याची शक्यता आहे. तटकरे यांनी सत्तेपासून शिंदेंच्या शिवसेनेला दूर ठेवण्यासाठी रणनीती आखत भाजप राष्ट्रवादी युतीची घोषणा आधीच करून घेतली आहे. तसेच ठाकरेंची शिवसेनाही आपल्यासोबत असल्याचे त्यांनी म्हटले होते.
तटकरे यांनी की, कर्जत तालुक्यात राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाने एकत्र निवडणूक लढवली होती आणि त्यांना मोठे यश मिळाले. त्यामुळे हाच फॉर्म्युला जिल्हा परिषदेतही वापरण्याची शक्यता आहे. अंतिम निर्णय वरिष्ठ पातळीवरील चर्चेनंतर घेतला जाईल, असे स्पष्ट केले होते. तसेच या युतीत कर्जतमधील काही अपक्ष देखील येतील असेही त्यांनी संकेत दिले आहेत. पण या दाव्यानंतर अद्याप याबाबत ठाकरेंच्या शिवसेनेकडून अधिकृत अशी कोणतीच माहिती समोर आली नसून ते कोणती भूमिका घेतात याकडे शिंदेंच्या शिवसेनेसह काँग्रेस आणि जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
1. रायगडमध्ये ‘चंद्रपूर पॅटर्न’ म्हणजे काय?
चंद्रपूरमध्ये झालेल्या विशिष्ट राजकीय युतीच्या धर्तीवर नवीन सत्ता समीकरण तयार होण्याची शक्यता याला ‘चंद्रपूर पॅटर्न’ म्हटले जाते.
2. शिंदेंच्या शिवसेनेला सत्तेबाहेर का जावे लागू शकते?
स्पष्ट बहुमत नसल्याने इतर पक्षांनी एकत्र येत सत्ता स्थापन केल्यास शिंदे गट सत्तेबाहेर राहू शकतो.
3. अजित पवार आणि भाजप युती कितपत शक्य आहे?
राजकीय हालचाली आणि वक्तव्यांवरून अशी शक्यता वर्तवली जात आहे, मात्र अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.
4. ठाकरे यांच्या शिवसेनेची भूमिका काय असू शकते?
ठाकरे गट युतीत सहभागी झाल्यास सत्ता समीकरण पूर्णपणे बदलू शकते.
5. या राजकीय बदलाचा जिल्हा प्रशासनावर काय परिणाम होईल?
नवीन आघाडी सत्तेत आल्यास जिल्हा परिषदेतील धोरणे आणि नेतृत्वात बदल होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.