NCP Merger : विलीनीकरणाचे माहीत नाही म्हणणाऱ्या तटकरेंना तोंडावर पाडले, अमोल कोल्हेंनी दिला सगळ्यात मोठा खुलासा

Amol Kolhe vs Sunil Tatkare : सुनील तटकरे यांनी विलीनीकरणाच्या चर्चेविषयी माहिती नसल्याचे म्हटले होते. त्याला खासदार अमोल कोल्हेंनी प्रत्युत्तर दिले आहे.
Sunil Tatkare -Amol Kolhe
Sunil Tatkare -Amol KolheSarkarnama
Published on
Updated on

NCP Merger controversy : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमानदुर्घटनेतील अपघातानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीकरणाबाबत माहिती समोर आली. अजितदादांसोबत विलीनीकरणाबाबत चर्चा झाली असल्याचे शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांनी सांगितले. बैठकांचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले.

मात्र, अजितदादांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मात्र आपल्याल या विलीनीकरणाबाबत माहिती नाही. तसे असते तर अजितदादांनी आपल्याला सांगितले असते अशी भूमिका घेतली.

तटकरे यांनी जी भूमिका घेतली ती खोडून काढताना 'साम टिव्ही'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये खासदार अमोल कोल्हेंनी सर्वात मोठा पुरावा दिला. ते म्हणाले,

'अशोक बापू पवारांच्या पत्नी सुजाताभाभी पवार या घड्याळाच्या चिन्हावर लढतात. हर्षवर्धन पाटील जे आमच्या पक्षाचे नेते आहेत. त्यांच्या कन्या अंकित पाटील या घड्याळ चिन्हावर लढतात. मग यांना एबी फाॅर्म कोणी दिले हो?'

'असे प्रदेशाध्यक्ष कोणी म्हणत असतील आम्हाला कल्पना नाही त्यांनी याचंही उत्तर द्यावं ना. एबी फाॅर्मवर तर प्रदेशाध्यक्षांची सही असते. या नेत्यांचे किंवा त्यांच्या कुटुंबीयांचे ऑफीशियल प्रवेशसुद्धा झालेले नाहीत. मग हे एबी फाॅर्म कसे दिले तुम्ही.', असा सवाल देखील कोल्हे यांनी उपस्थित करत तटकरेंना टोला लगावला.

Sunil Tatkare -Amol Kolhe
Kirit Somaiya Politics: महापौर नसरीन बानो यांचा किरीट सोमय्यांना दणका; बांगलादेशी वादाची वात पुन्हा पेटवली!

पुढे बोलताना ते म्हणाले, '16 मेला मी या चर्चेत आलो. माझा बारामती ते पुणे हा प्रवास अजितदादांसोबत झाला होता. माळेगाव साखर कारखान्याची निवडणुकीची प्रचारसभा संपवून दादा आम्ही सोबत प्रवास करत होतो. विलीनीकरणाचे जे टप्पे होते त्यामध्ये मी देखील सहभागी झालो होतो.'

जयंत पाटलांच्या घरी 11 बैठका

ज्या 14 बैठका झाल्या आहेत, त्यातील 11 वेळा बैठका जयंत पाटलांच्या घरी झाल्या आहेत. पण दुर्देवाने ज्यांच्याशी चर्चा केली आज ते आपल्यात नाहीत. मग काय चर्चा झाली होती? कशासाठी झाली होती? या सगळ्या गोष्टींविषयी बोलण्यात काही हाशील आहे असे वाटतं नाही.

Sunil Tatkare -Amol Kolhe
Police Crime: पोलीस लूट; १.३३ कोटींचा अपहार करणारा उपनिरीक्षक वाघ का पकडला गेला नाही?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com