BJP Shivsena NCP  Sarkarnama
महाराष्ट्र

Mahayuti Politics: महायुतीचा महापालिकेनंतर ZP अन् पंचायत समितीतही डंका; 'बिनविरोध पॅटर्न' सुसाट; किती उमेदवारांनी उधळला गुलाल?

ZP And Panchayat Samiti Election : महायुतीनं जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकी आधीच तळकोकणात तब्बल 21 उमेदवार बिनविरोध निवडून आणण्याचा करिष्मा करुन दाखवला आहे. एकीकडे विरोधकांकडून बिनविरोध पॅटर्नवर जोरदार टीका होत असताना दुसरीकडे महायुतीनं झेडपी आणि पंचायत समितींच्या निवडणुकांमध्ये 21 उमेदवार बिनविरोध करत मोठं यश मिळवलं आहे.

Deepak Kulkarni

Mumbai News: राज्यातील नगरपरिषदा,नगरपंचायती निवडणुकांनंतर महापालिका निवडणुकाही नुकत्याच पार पडल्या. आता मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत मंगळवारी (ता.27) संपली आहे. त्यामुळेच आता 15 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितीच्या निवडणुकांच्या अंतिम लढतींचे चित्र आता स्पष्ट झाले आहेत. त्यात विशेष म्हणजे महापालिकेतीन बिनविरोधचा पॅटर्न आता पुन्हा एकदा जिल्हा परिषद (ZP) आणि पंचायत समितींच्या निवडणुकांमध्ये दिसून आला आहे.

जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकांच्या अंतिम लढती निश्चित झाल्यानंतर आता प्रचाराच्या तोफा धडाडणार आहे. पण आता मतदानापूर्वीच महायुतीतील काही उमेदवारांनी विजयाचा गुलाल उधळला. महायुतीचे एकूण तब्बल 22 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. या 'बिनविरोध'च्या पॅटर्नवर कोकणात चांगलाच सुसाट राहिल्याचं समोर आलं आहे.

महायुतीनं जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकी आधीच तळकोकणात तब्बल 21 उमेदवार बिनविरोध निवडून आणण्याचा करिष्मा करुन दाखवला आहे. एकीकडे विरोधकांकडून बिनविरोध पॅटर्नवर जोरदार टीका होत असताना दुसरीकडे महायुतीनं झेडपी आणि पंचायत समितींच्या निवडणुकांमध्ये 21 उमेदवार बिनविरोध करत मोठं यश मिळवलं आहे.

महायुतीनं सिंधुदुर्ग आणि रायगडमध्ये उमेदवारांना मोठ्या प्रमाणात बिनविरोध करताना विरोधकांना धोबीपछाड दिला आहे. रायगड जिल्ह्यातील महाड पंचायत समितीच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे अनिल जाधव हे बिनविरोध निवडून आले आहेत.

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत भाजपने 19 तर शिंदे सेनेने 2 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. झेडपीच्या निवडणुकांमध्ये भाजपकडून सावी लोके,प्राची इस्वालकर, अवनी तेली, प्रमोद कामत, सुयोगी घाडी, प्रमोद रावराणे या बिनविरोध झाल्या आहेत. तर,एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतून रुहिता तांबे यांनी बिनविरोध विजय मिळवला आहे.

भाजपकडून याचठिकाणी पंचायत समितीत संजना राणे, सोनू सावंत, साधना नकाशे, अंकुश ठूकरूल, गणेश राणे, संजना लाड, सायली कृपाळ, हर्षदा वाळके, शीतल तावडे,समृद्धी चव्हाण, महेश्वरी चव्हाण, सीमा परुळेकर, संकेत धुरी हे उमेदवार बिनविरोध झाले आहेत.

तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून कोलझर पंचायत समितीमधून गणेशप्रसाद गवस हे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. याठिकाणी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने हे उमेदवार बिनविरोध झाले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT