Ganesh Naik Vs Eknath Shinde: महायुतीतला शिंदे विरुद्ध नाईक वाद टोकाला; संतापलेल्या शिवसेना खासदाराचं भाजप प्रदेशाध्यक्षांनाच पत्र

Shivsena Vs BJP: शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाणांना लिहिलेल्या पत्रात गणेश नाईकांबाबत तक्रार केली आहे.म्हस्के यांनी या पत्रात आपले मित्रपक्ष असलेल्या राज्य आणि अनेक महानगरपालिका नगरपालिकांमध्ये सत्तेत सहभागी असलेल्या,युती म्हणून लढून युती म्हणून जिंकून आलेल्या शिवसेनेला संपवण्याचा विडा उचलला आहे,असं त्यांनी म्हटलं आहे.
Eknath Shinde Naresh Mhaske VS Ganesh Naik
Eknath Shinde Naresh Mhaske VS Ganesh Naiksarkarnama
Published on
Updated on

Thane News: महायुती सरकारमध्ये एकत्र असूनही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे मंत्री गणेश नाईक यांच्यातील वाद मिटण्याऐवजी दिवसेंदिवस टोकदार होत चालला आहे. सातत्यानं भाजप नेते गणेश नाईक यांच्याकडून शिंदेंवर जिव्हारी लागणारी टीका केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा संयम संपला आहे. वार-पलटवारांनंतर अखेर गणेश नाईकांना आवरा म्हणत शिवसेनेचे ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी थेट भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांना पत्र लिहिलं आहे.

नवी मुंबई वा ठाणे महानगरपालिकेची निवडणूक संपल्यानंतरही राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदेंना डिवचण्याचं धोरण कायमच ठेवल्याचं दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर आता खासदार नरेश म्हस्के यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना पत्र लिहून गणेश नाईकांनाच चॅलेंज दिलं आहे. शिवसेनेचं नामोनिशाण मिटवून टाकण्याची परवानगी मागणाऱ्या म्हस्के यांनी पत्रात म्हटलं आहे.

शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाणांना लिहिलेल्या पत्रात गणेश नाईकांबाबत तक्रार केली आहे.म्हस्के यांनी या पत्रात आपले मित्रपक्ष असलेल्या राज्य आणि अनेक महानगरपालिका नगरपालिकांमध्ये सत्तेत सहभागी असलेल्या,युती म्हणून लढून युती म्हणून जिंकून आलेल्या शिवसेनेला संपवण्याचा विडा उचलला आहे,असं त्यांनी म्हटलं आहे.

म्हस्के पुढे म्हणतात, एकेकाळी स्वतः शिवसैनिक असलेल्या गणेश नाईक यांनी आमचे प्रमुख नेते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अनेकवेळा डिवचून नवी मुंबईतून शिवसेनेला धोबीपछाड देण्याचे, टांगा पलटी करण्याचे आणि शिवसेनेला नवी मुंबईतून मुळातून संपवून टाकण्याचे स्पष्ट इरादे अनेक प्रसारमाध्यमातून जाहीररित्या मांडले आहेत.

Eknath Shinde Naresh Mhaske VS Ganesh Naik
Girish Mahajan : गिरीश महाजनांकडून दिलगिरी..पण प्रकाश आंबेडकर म्हणतात पोलिसांना गुन्हा नोंदवण्यास भाग पाडेल..वाद आणखी वाढला

आता तर त्यांनी जाहीरपणे पक्षानं परवानगी दिली तर शिवसेनेचं नामोनिशाण मिटवून टाकू असं बेताल वक्तव्य केले.मी तमाम शिवसैनिकांच्या वतीनं आणि शिवसेना पक्षाच्या वतीनं विनंती करतो की, त्यांच्या ह्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांना शिवसेनेचे नामोनिशाण मिटवून टाकण्याची परवानगी द्यावीच. आमची तयारी आहे, असंही म्हस्के यांनी पत्रात म्हटलं आहे.

तसेच महाराष्ट्रात महाबिघाडीची सत्ता उलथवून टाकण्यात भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे या दोघांची मोठी भूमिका राहिली आहे. त्यानंतरच युतीचे सरकार महाराष्ट्रात येऊ शकले आणि आज कल्याण डोंबिवली, ठाणे, मुंबई या ठिकाणी युती म्हणून लढत देऊन महानगरपालिका, नगरपालिकांच्या निवडणुकांत आपण मोठे यश मिळवले आहे.या सर्व निर्णयांमध्ये आपली ही सक्रिय भूमिका राहिली असल्याचंही शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी भाजप प्रदेशाध्यक्षांना सांगितलं आहे.

Eknath Shinde Naresh Mhaske VS Ganesh Naik
Rahul Gandhi : काँग्रेस आणखी एका राज्याची निवडणूक हरणार? राहुल गांधींच्या कृतीने केला घोळ! भाजपचा तुफान हल्लाबोल

नरेश म्हस्के यांनी या पत्रात गणेश नाईकांवर सडकून टीका करतानाच सगळीकडे युती असताना युतीतल्या मोठ्या घटक पक्षाबद्दल असं विधान वारंवार करणे म्हणजे आपल्या पक्ष नेतृत्वावरच अविश्वास दाखवण्यासारखे असल्याची खंतही व्यक्त केली आहे. एखाद्या व्यक्तीवरचा राग समजू शकतो, परंतु त्यासाठी पक्ष,पक्षीय भूमिका,पक्षाचा अजेंडा या सगळ्या बाबी धुडकावून लावत गणेश नाईक आमचे नामोनिशाण मिटवण्याचे वक्तव्य करत आहेत असंही त्यांनी पत्रात नमूद केलं आहे.

मोदींच्या आणि अमित शाह यांच्या मार्गदर्शनाखाली एकनाथ शिंदे,देवेंद्र फडणवीस दिवसरात्र काम करीत आहेत. काही बाबतीत विचार वेगळे असले तरी एक हिंदुत्ववादी, राष्ट्रीय विचारांचे स्थिर सरकार आपण त्यामुळेच देऊ शकलो आहोत. परंतू, त्यांना हे बघवत नसल्यानेच कदाचित ते अशी मागणी करत असावेत. धर्मवीर आनंद दिघे असताना गणेश नाईकांना शिवसेनेने कशी धोबीपछाड दिली होती ते त्यांनी एकदा आठवावे.

Eknath Shinde Naresh Mhaske VS Ganesh Naik
Baramati Ink Attack: नाशिकनंतर बारामतीत नव्या वादाला तोंड फुटलं; अजितदादांच्या शिलेदारानं डावलला बाबासाहेबांचा फोटो,'वंचित'ची नगराध्यक्षांवर शाईफेक

किंबहुना आपण त्यांना त्याचे स्मरण करून द्यावे. बाकी, शिवसेना त्यांच्या प्रत्येक आव्हानाला उत्तर द्यायला सज्ज आहे. आज नवी मुंबईत दहा जागाही शिवसेनेच्या निवडून येऊ शकत नाहीत अशा वल्गना करणाऱ्या गणेश नाईकांना आम्ही 42 जागा निवडून आणून दाखवले आहे. कदाचित त्यामुळेच त्यांची अस्वस्थता वाढलेली असू शकते.

दिवस-रात्र लोकांच्यासाठी कार्यरत असणाऱ्या शिंदे साहेबांवर त्यामुळेच त्यांचा राग असू शकतो. तेव्हा त्यांच्या सर्व वक्तव्यांचा सखोल विचार करून त्यावर चिंतन करून आपण त्यांना शिवसेना संपवण्याची जबाबदारी देऊन टाकावीत असं म्हस्के यांनी मागणी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com