Vidhan Sabha Election  Sarkarnama
महाराष्ट्र

Mahayuti News : लाडक्या बहिणींना सत्तेतही मोठा वाटा मिळणार? महायुतीकडून महिला आमदारांना 'गिफ्ट'!

Mahayuti new government ministerial posts : नव्या सरकारमध्ये भाजपचा गड राखून ठेवलेल्या आमदारांची मंत्रिमंडळात वर्णा लागणार आसल्याची माहिती समोर आली आहे.

Rashmi Mane

राज्यात विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग आला आहे. निवडणुकीत महायुती सरकारनं मोठं यश मिळवलं. विधानसभेत मोठ्या प्रमाणावर जागा जिंकून पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार का तसेच उपमुख्यमंत्री पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे सगळ्यांचेच लक्ष आहे. पण या चर्चांमध्ये लाडक्या बहि‍णींना ओवाळणी देणारं महायुती सरकार महिला आमदारांना सत्तेत वाटा देणार का? अशीही चर्चा होतांना दिसत आहे. नव्या सरकारमध्ये भाजपचा गड राखून ठेवलेल्या आमदारांची मंत्रिमंडळात वर्णा लागणार आसल्याची माहिती समोर आली आहे.

मंत्रीपद देण्याच्या अनुषंगानेच महिला आमदारांचं प्रोफाईल दिल्लीला पाठवल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. भाजपकडून यंदा विधानसभेवर 14 महिला आमदार आहेत. राष्ट्रवादीच्या 4 तर शिवसेनाकडून (Shivsena) 2 आमदार विधानसभेवर निवडून आल्या आहेत. 14 निवडून आलेल्या आमदारांपैकी 4 महिला आमदारांची मंत्री पदी वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

यंदाच्या निवडणुकीत लाडकी बहीण योजनेचा प्रभाव राज्यात पाहायला मिळाला. त्यामुळे चार महिला आमदारांची देखील मंत्रि‍पदी वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामध्ये आता त्या चार आमदार कोण यांची चर्चा प्रामुख्याने होत आहे. मंत्रिमंडळात महिलांची संख्या वाढवण्यावर महायुती सरकार भर देत आहे. मुख्यमंत्रीपद ठरल्यानंतर मंत्रिमंडळातील खाते वाटपावर भर दिला जाणार आहे. त्यामध्ये कोणत्या महिलांची वर्णी लागते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

यामध्ये मागच्या मंत्रिमंडळात महिला व बालविकास खातं सांभाळलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांचे नाव प्रामुख्याने घेतलं जात आहे. भाजपच्या पंकजा मुंडे आणि माधुरी मिसाळ श्वेता महाले, देवयानी फरांदे यांच्या नावाची चर्चा आहे. तर शिंदे सेनेकडून भावना गवळी आणि मनीषा कायंदे या महिला आमदारांची मंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT