Mahayuti Government Formation: मुख्यमंत्री शपथविधीची तारीख ठरली! नरेंद्र मोदींसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार

Maharashtra Vidhan Sabha Election Mahayuti Government Formation:सुरक्षेच्या कारणामुळे हा शपथविधी सोहळा बीकेसीमध्ये होणार असल्याचे समजते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपशासित राज्याचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत.
Narendra Modi, Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra Fadnavis
Narendra Modi, Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : विधानसभेच्या निकाल लागून आज सात दिवस झाली, पण अद्यापही मुख्यमंत्रि कोण विराजमान होणार, हे ठरलेले नाही. येत्या दोन दिवसात महायुतीकडून मुख्यमंत्रिपदाचे नाव जाहीर करण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांचे नाव गुलदस्तात असले तरी शपथविधीची तारीख ठरली असल्याचे माहिती आहे.

6 डिसेंबर हा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे. यात दिवशी महाराष्ट्रात मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी सोहळा होणार असल्याचे वृत्त साम टिव्हीने दिले आहे.संविधान समोर ठेऊन शपथविधी होईल, अशी माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली. सुरक्षेच्या कारणामुळे हा शपथविधी सोहळा बीकेसीमध्ये होणार असल्याचे समजते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपशासित राज्याचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत.

Narendra Modi, Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra Fadnavis
Eknath Shinde : शहांच्या भेटीनंतर शिंदे नाराज आहेत का? फडणवीसांनी शेअर केलेल्या फोटोवर काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणाले,...

गुरुवारी रात्री अमित शाह यांच्यासोबत एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांची अडीच तास बैठक झाली. यात खातेवाटपाबाबत सविस्तर चर्चा झाली. मुख्यमंत्रीपदासोबत गृहमंत्री पद मिळावे, असा आग्रह भाजपने धरला आहे. तर शिवसेनेने गृहमंत्रिपदावरील दावा सोडलेला नाही. यावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरु आहे.

आज मुंबईत महायुतीची बैठक होणार आहे .यात हा तिढा सुटेल, असे वाटते. येत्या दोन दिवसात मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार याची घोषणा होणार आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पसंती असली तरी भाजपच्या धक्कातंत्रामुळे नवीन नाव समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Narendra Modi, Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra Fadnavis
Maharashtra Government Formation: ज्येष्ठ, अनुभवी नेत्यांचे पत्ते कट? नव्या सरकारमध्ये असणार 'यंग ब्रिगेड'

दिल्लीतील बैठकीत भाजपाने काही मुद्दे शिंदे आणि अजित पवारांना अगदी स्पष्टपणे सांगितल्याचीही माहिती समोर येत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासमोर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेची भूमिका मांडताना 12 मंत्रिपदांची मागणी केली असल्याची माहिती आहे.

विधान परिषदेच्या सभापती पदाची देखील शिवसेनेकडून मागणी करण्यात आली आहे. गृहमंत्रिपदाबरोबरच नगरविकास आणि इतर महत्वाची खातीही शिवसेनेला हवी आहेत. पालकमंत्री पद देताना देखील पक्षाचा योग्य सन्मान राखावा, अशी विनंती अमित शहांकडे शिंदे यांनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com