Pune News : विधानसभा निवडणुकीनंतर प्रचंड बहुमतासह सत्तेत आलेल्या महायुती सरकारमध्ये गेल्या काही महिन्यांपासून आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा चांगलाच धडाकाच लावल्याचं दिसून येत आहे. राज्य सरकारकडून महिन्याभरात दोन तीनदा बदल्यांचा आदेश काढला जात आहे. यामुळे प्रशासकीय विभागात बदल्यांमुळे खळबळ उडाली आहे.
राज्य सरकारकडून बुधवारी (ता.21) 8 वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात पुणे महापालिकेच्या आयुक्तपदी आता नवल किशोर राम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आयएएस (IAS) अधिकारी जे एस पापळकर यांची छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
पुण्यातील क्रीडा आणि युवा आयुक्तपदाची धुरा शितल तेली उगले यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. तसेच धुळ्याच्या जिल्हाधिकारीपदाची जबाबदारी भाग्यश्री विसपुते यांच्याकडे देण्यात आली आहे. तर अमरावतीचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांची बृहन्मुंबई जिल्हाधिकारी बदली करण्यात आली आहे. अमरावतीच्या जिल्हाधिकारीपदी आशिष येरेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नवल किशोर राम यांच्या पुणे (Pune) महापालिकेचे नवे आयुक्तपदी नियुक्तीचे आदेश काढले आहेत. पुणे महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले हे 31 मे 2025 रोजी सेवेतून निवृत्त होत आहे. त्याचमुळे नवल किशोर राम यांची पुणे महापालिका आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
1. नवल किशोर राम (IAS:RR:2008) - आयुक्त, पुणे महानगरपालिका
2. शीतल तेली-उगले (IAS:RR:2009) - क्रीडा आणि युवा आयुक्त, पुणे
3. जे.एस. पापळकर (IAS:SCS:2010) - विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजी नगर
4. सी.के. डांगे (IAS:SCS:2010) - सहसचिव, मुख्य सचिव कार्यालय, सामान्य प्रशासन विभाग
5. सौरभ कटियार (IAS:RR:2016) जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर जिल्हा
6. भाग्यश्री विसपुते (IAS:RR:2017) जिल्हाधिकारी, धुळे
7. आनंद भंडारी (IAS:NON-SCS:2017) मुख्य कार्यकारी अधिकारी, अहिल्यानगर जिल्हा परिषद
8. आशिष येरेकर (IAS:RR:2018) जिल्हाधिकारी, अमरावती
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.