Ahilyanagar gram panchayat notice : 378 ग्रामपंचायत सदस्यांना अपात्रतेचा धक्का बसणार; जिल्हाधिकारी कार्यालयानं बजावल्या नोटीसा

Ahilyanagar Notice to 378 Panchayat Members on Caste Proof : जातवैधता प्रमाणपत्रक्ष मुदतीत सादर न करणाऱ्या अहिल्यानगर जिल्ह्यातील 378 ग्रामपंचायत सदस्यांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे.
Ahilyanagar gram panchayat
Ahilyanagar gram panchayatSarkarnama
Published on
Updated on

District collector action Ahilyanagar : जातवैधता प्रमाणपत्र तीन वर्षात सादर न करणाऱ्या अहिल्यानगर जिल्ह्याच्या सात तालुक्यातील 378 ग्रामपंचायत सदस्यांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. जिल्हाधिकारी प्रशासनाकडून यासंदर्भात सुनावणी सुरू झाली असून, संबंधित ग्रामपंचायत सदस्यांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.

सुनावणी निश्चित केलेल्या तारखेला संबंधित सदस्याने म्हणणे सादर करणे बंधनकारक असल्याचे नोटीसमध्ये म्हटले आहे. सुनावणीस गैरहजर राहिल्यास, पूर्वलक्षी प्रभावाने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमानुसार निवड रद्द करण्याची कारवाई केली जाईल, असेही नोटिसीमध्ये स्पष्ट केले आहे.

एक जानेवारी 2021 नंतर ते ऑगस्ट 2022 पूर्वी राखीव प्रवर्गातून निवडून आलेल्या. परंतु जुलै 2024 पर्यंत सक्षम प्राधिकरणाचे जात पडताळणी प्रमाणपत्र सादर न केलेल्या ग्रामपंचायत सदस्यांना तहसीलदारांमार्फत महाराष्ट्र (Maharashtra) ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 10 (1) (अ) प्रमाणे सुनावणीच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

राखीव जागेवर निवडणूक (Election) लढविणाऱ्या व्यक्तीने उमेदवारी अर्जासमवेत सक्षम प्राधिकरणाने दिलेले जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. ग्रामविकास विभागाने यासाठी आणखी १२ महिन्यांची मुदतवाढ दिली होती. परंतु या मुदतीकडे देखील राखीव जागांवर निवडून आलेल्या अनेक सदस्यांनी दुर्लक्ष केले.

Ahilyanagar gram panchayat
Uddhav Thackeray Raj Thackeray meeting : ठाकरे बंधू भेटीचा लवकर मुहूर्त; अनिल परबांनी फोडला 'बाॅम्ब'

मुदतीत जातवैधता प्रमाणपत्र सादर केले नाही, तर त्याला म्हणणे मांडण्याची संधी दिली जाते. जामखेड तालुक्यातील 82, राहात्यामधील 10, अहिल्यानगरमधील 55 या तीन तालुक्यातील राखीव प्रवर्गातून निवडून आलेल्या एकूण 147 सदस्यांची सुनावणी जिल्हाधिकारी कार्यालयात पूर्ण झाली आहे. तसेच श्रीरामपूरमधील 25, राहुरीतील 21 यांच्या आज सुनावणी झाली.

Ahilyanagar gram panchayat
BJP vs Congress : पंतप्रधान मोदी, 'डरपोक', 'खुनी माणूस', 'गद्दार'; माजी आमदाराच्या जहरी टीकेनं काँग्रेस घेरली जाणार

संगमनेर तालुक्यातील 101 आणि अकोल्यातली 34 जणांना सुनावणीच्या नोटिसा लवकरच बजावल्या जातील. या दोन्ही तालुक्यातील सुनावणीच्या तारखा अद्याप निश्चित करण्यात आलेल्या नाहीत. श्रीगोंदा, पारनेर, शेवगाव, पाथर्डी, कर्जत, जामखेड आणि कोपरगाव या तालुक्यातील जातवैधता प्रमाणपत्र सादर न केलेल्या सदस्यांची सुनावणी होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com