Walmik Karad  Sarkarnama
महाराष्ट्र

Santosh Deshmukh Murder Case : संतोष देशमुख हत्येप्रकरणी मोठी अपडेट; वाल्मिक कराडसह चार आरोपींवर केली 'ही' कारवाई

Police action in murder case: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीने मोठी कारवाई केली.

सरकारनामा ब्युरो

Beed News : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाने राज्यातील वातावरण तापले असून बीड जिल्ह्यात सर्वत्र याची धग पाहायला मिळत आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता एक मोठी अपडेट समोर येत आहे. देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीने मोठी कारवाई केली. खंडणी आणि हत्या प्रकरणातील फरार आरोपींच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे. या प्रकरणात सीआयडीने आता वाल्मीक कराडसह चार आरोपींचे बँक खाते गोठवल्याचे समजते.

संतोष देशमुख हत्या प्रकरणी व खंडणी प्रकरणातील फरार आरोपींसाठी सीआयडीचे (CID) नऊ पथकांकडून तपास सुरू आहे. या प्रकरणाचा जवळपास दीडशे अधिकारी अन् कर्मचारी यांच्याकडून तपास सुरू आहे. या प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली असून फरार वाल्मीक कराड यांच्यासह चारही आरोपींचे बँक खाते सील केली आहेत.

त्यासोबतच पासपोर्टविषयी देखील कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणाचा राज्यासह देशभरात तपास सुरू आहे. ठशाचे निशाण आरोपीसोबत मॅच झाले आहेत. चार वेगवेगळ्या ठिकाणी मारहाण झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आता सीआयडीकडून या संपूर्ण प्रकरणाचा वेगाने तपास सुरु आहे .

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी सीआयडीकडून वाल्मिकी कराड यांच्या पत्नीची चौकशी करण्यात आली होती, आता या प्रकरणात अनेकांची चौकशी करण्यात येत आहे. त्यानुसार रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांची चौकशी सुरु आहे. सीआयडीकडून या चौकशीबाबत प्रचंड गुप्तता पाळण्यात येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT