Suresh Dhas Vs Pankaja Munde : पंकजा मुंडेंसोबतच्या भांडणाची सुरेश धसांनी प्रथमच दिली जाहीर कबुली; ‘होय आमच्यात भांडण...’

Beed Political News : पंकजा मुंडे आणि माझ्यामध्ये कोणतं तात्विक भांडण आहे. लोकसभेच्या निवडणुकीत मी पंकजा मुंडे यांचे काम प्रामाणिकपणे केले होते.
Suresh Dhas-Pankaja Munde
Suresh Dhas-Pankaja MundeSarkarnama
Published on
Updated on

Beed, 29 December : भारतीय जनता पक्षाचे आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्यासोबत असलेल्या वादावर प्रथमच जाहीरपणे भाष्य केले आहे. विधानसभा निवडणुकीपासून सुरेश धस आणि पंकजा मुंडे यांच्यात अबोला असून पूर्वी एकत्र काम करणारे या दोघांमध्ये भांडण असल्याचे चित्र आहे, त्यावर सुरेश धस यांनी आज भाष्य केले आहे. पकंजा मुंंडे आणि माझ्यात तात्विक भांडण आहे, अशी कबुली आमदार धस यांनी दिली आहे.

आष्टी पाटोदा मतदारसंघातील सरपंचांच्या कार्यक्रमात आमदार सुरेश धस (Suresh Dhas) बोलत होते. त्या कार्यक्रमात बोलताना धस यांनी पंकजा मुंडे यांच्यासोबत असलेल्या भांडणाबाबत विधान केले आहे. ते म्हणाले, पर्यावरण आणि हवामान बदल हे खातेही आपल्याच बीड जिल्ह्याकडे आहे. माझं आणि पंकजा मुंडे यांचे एका निवडणुकीवरून तात्विक भांडण आहे. पण, पर्यावरण आणि पर्यटनाच्या बाबतीत तुमच्या काही मागण्या असतील तर त्या द्या. मतदारसंघाचा प्रतिनिधी म्हणून शंभर टक्के त्यांच्याकडून काम करून घेईल. त्यासुद्धा करतील, अशी आशा बाळगतो.

दरम्यान, पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्यासोबत असलेल्या भांडणावरही त्यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, पंकजा मुंडे आणि माझ्यामध्ये कोणतं तात्विक भांडण आहे. लोकसभेच्या निवडणुकीत मी पंकजा मुंडे यांचे काम प्रामाणिकपणे केले होते. पण त्यानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी माझं काम प्रामाणिकपणे केलेले नाही, हा माझा पंकजा मुंडेंवर स्पष्ट आरोप आहे, असेही धस यांनी स्पष्ट केले.

Suresh Dhas-Pankaja Munde
Prajakta Mali Vs Suresh Dhas : ‘प्राजक्ता, या लढाईत तू एकटी नाहीस’; सुरेश धसांचे कान टोचत चित्रा वाघांचा माळीला पाठिंबा

ते म्हणाले, पैसा हा सर्वश्रेष्ठ नाही तर माणूस महत्वाचा आहे. माणसं सांभाळा, माणसं तोडू नका. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आता एकच विनंती करणार आहे, मुख्यमंत्री महोदय, पैसा केंद्राचा आणि मार्गदर्शक तत्वे हातभर राज्य सरकारची हा उद्योग बंद करा, अशी विनंती मी करणार आहे. पाणी पुरवठ्यावर एवढे खर्च करावेत, शौचालयावर एवढी रक्कम खर्च करावी. ती यादी एवढी मोठी असते की सरपंचांच्या वाट्याला काहीच येत नाही.

मेंबर कसे निवडून येतात माहीत नाही का? फार्म भरायच्या वेळी अरे तुझे शौचालय नाही, तुझी पाणीपट्टी भरलेली नाही, घरपट्टी भरलेली नाही. निवडणुकीचं डिपॉझिट ह्या गड्याचे हात कायम वर. तेव्हा सरपंच म्हणतो भरतो ना. त्यांची पाच पन्नास मतं असतात. सरपंचांचा खिसा खाली होतो. वर्षे दोन वर्षे झाले की काय खरं नाही सरपंचांचं. आमच्याकडे लक्षच देत नाही, आमच्याकडं बघतच नाही, अशी परिस्थिती आहे, असा दावाही त्यांनी केला.

Suresh Dhas-Pankaja Munde
Babanrao Shinde : अजित पवारांसोबत कायम राहण्याचे बबनराव शिंदेंचे स्पष्ट संकेत; ‘पूर्वीपासून ज्या फळीत काम केले, त्याच...’

सरपंच क्या है तेरा इरादा.... कारण निवडणुकीत त्यांनी हे करू ते करू असं सांगितलेलं असतं. त्यामुळे मेंबर सरपंचांना विचारतो, क्या हुआ तेरा वादा...गेला कामातून असली सध्या अवस्था आहे, अशी सत्य परिस्थिती त्यांनी कथन केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com