Nashik News : नाशिक महापालिकेत सध्या परसेवेतील अधिकारी आणि स्थानिक अधिकारी असे दोन गट पडले आहेत. त्याला कारणही तसेच घडले आहे. गेल्या अनेक वर्ष या अधिकाऱ्यांना दुय्यम दर्जाचे अधिकार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
नाशिक महापालिकेने सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी सुरू केली आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या मूलभूत कामांच्या निविदा काढण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. त्यामुळे अनेक परसेवेतील अधिकाऱ्यांना कुंभमेळा आणि नाशिक महापालिका यामध्ये रस निर्माण झाला आहे.
त्याला कारणही तसेच घडले आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागातील कार्यकारी अभियंता महुवा बॅनर्जी यांची महापालिकेत नियुक्ती झाली आहे. हे नियुक्ती स्थानिक अधिकाऱ्यांमध्ये असंतोषाचे कारण ठरले आहे.
या संदर्भात महापालिकेचे आयुक्त मनीषा खत्री यांच्याकडे स्थानिक अधिकाऱ्यांनी तक्रार केली आहे. याबाबत अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ त्यांना भेटले स्थानिक अधिकाऱ्यांना पदोन्नती आणि योग्य मान न मिळता परिषदेतील अधिकाऱ्यांना नियुक्ती दिली जात असल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली.
सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी म्हणून महापालिकेकडे अनेक प्रकल्प आहेत. या प्रकल्पांमध्ये परसेवेतील अधिकाऱ्यांबरोबरच राजकीय नेत्यांनाही विशेष रस आहे. या अंतर्गत राजकारणातूनच परत सेवेतील अधिकाऱ्यांना वरिष्ठ राजकीय नेत्यांचा आशीर्वाद लाभल्याचे बोलले जाते. त्यातून स्थानिक विरुद्ध परसेवेतील अधिकारी अशी वादाची ठिणगी पडली आहे.
या संदर्भात नागरिकांचा रोष निर्माण झाल्यास अथवा काही समस्या आल्यास परसेवेतील अधिकारी आपली जबाबदारी झटकतात अनेक अधिकारी सोयीनुसार काम करतात. अडचणीच्या वेळी फोन स्विच ऑफ करून परागंदा होतात. सर्व समस्यांना स्थानिक अधिकाऱ्यांनाच सामोरे जावे लागते.
याची कबुली खुद्द आयुक्त खत्री यांनीच दिली आहे. त्यामुळे आगामी काळात जसजसा सिंहस्थ कुंभमेळा जवळ येईल, तसे हे वाद नव्याने निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यात स्थानिक आणि परसेवेतील अधिकारी यांच्यातच जुंपण्याची चिन्हे आहेत.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या अधिकारी महुआ बॅनर्जी त्याला निमित्त ठरल्या आहेत. बॅनर्जी यांनाही नाशिक महापालिकेत अचानक रस निर्माण झाला आहे. त्यामुळे अचानक त्यांची नियुक्ती आणि लगेचच पदभार देण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यामुळेच या बॅनर्जी नाशिक महापालिकेतही वादाचे कारण ठरवतात की काय अशी स्थिती आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.