Nashik Kumbh Mela : कुंभमेळ्याबाबत दुखावलेल्या मंत्री, आमदारांची का होतेय मनधरणी?

Kumbh Mela Controversy : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीला नाशिकच्या मंत्र्यांना टाळले होते.
Manikrao Kokate, Narhari Zirwal & Dada Bhuse
Manikrao Kokate, Narhari Zirwal & Dada BhuseSarkarnama
Published on
Updated on

Nashik News: महाकुंभमेळ्यात प्रयागराजला घडलेल्या दुर्घटनेने महाराष्ट्रातील सरकारही सजग झाले आहे. त्यामुळे नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीबाबत यंत्रणा सक्रिय झाल्या आहेत. यामध्ये सगळ्यांना सहभागी करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारी संदर्भात जानेवारी महिन्यात बैठक झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. मात्र या बैठकीत नाशिकच्या तीनही मंत्री आणि लोकप्रतिनिधींना डावलण्यात आले होते.

Manikrao Kokate, Narhari Zirwal & Dada Bhuse
Ajit Pawar politics: नरेंद्र पाटील यांनी मुंडे प्रकरणात अजित पवारांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले!

शासनाचे अवर मुख्य सचिव एकनाथ डवले यांच्या उपस्थितीत नाशिकला बैठक झाली. या बैठकीत प्रशासनाच्या उपाययोजना आणि प्रस्तावांवर चर्चा झाली. यामध्ये सिंहस्थ सुरक्षित आणि उत्तम प्रकारे पार पाडण्याबाबत विविध सूचना करण्यात आल्या. त्यात सर्व लोकप्रतिनिधींनाही निमंत्रीत केले होते.

Manikrao Kokate, Narhari Zirwal & Dada Bhuse
Chhagan Bhujbal Politics: छगन भुजबळांना आव्हान, येवल्यात होणार विधानसभेचे टेस्ट वोटिंग!

विशेष म्हणजे या बैठकीला कृषिमंत्री माणिकराव कोकाटे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ आणि शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांसह विविध लोकप्रतिनिधींनाही निमंत्रित करण्यात आले होते. या निमित्ताने मुंबईत झालेल्या बैठकीत लोकप्रतिनिधी आणि मंत्र्यांना महत्त्व देण्यात आले नव्हते. त्याबाबत उघडपणे नाराजी व्यक्त करण्यात आली.

बैठकीतील चर्चेदरम्यान लोकप्रतिनिधींनी याबाबत अनेक तक्रारी केल्याचे कळते. त्याची दखल घेत प्रशासनाने नाशिकचे सर्व मंत्री आणि लोकप्रतिनिधींनी आपले प्रस्ताव तसेच सूचना कराव्यात अशी विनंती केली. या सूचनांचा गांभीर्याने विचार केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

या निमित्ताने नाराज लोकप्रतिनिधींची मनधरणी करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून होत असल्याचे स्पष्ट झाले. सिंहस्थ कुंभमेळ्यात सुमारे साडेतीन हजार कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. यामध्ये विविध पायाभूत सुविधांचा समावेश आहे. या सुविधा प्रामुख्याने नाशिक शहराशी संबंधित आणि लगतच्या मतदारसंघात होतील.

आमदार आणि मंत्र्यांना कुंभमेळ्याच्या विकास आराकड्यात विशेष रस आहे. त्या दृष्टीने आता राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. महाकुंभमेळ्यात झालेल्या दुर्घटनेमुळे प्रशासन अधिक सावध झाले आहे. या संदर्भात कोणाचीही नाराजी परवडणारी नसल्याने प्रशासनाने अचानक आपली भूमिका बदलल्याने तो चर्चेचा विषय ठरला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com