Suresh Dhas, manjili karad  Sarakarnama
महाराष्ट्र

Suresh Dhas News : मंजिली कराडांच्या चॅलेंजनंतर सुरेश धसांची प्रतिक्रिया आली समोर; म्हणाले, 'भगिनीच्या आरोपांवर....'

Suresh Dhas Reaction News : वाल्मिक कराडची पत्नी मंजिली कराड यांनी पत्रकार परिषद घेत भाजप आमदार सुरेश धस यांना चॅलेंज देताना आपल्या पतीचे प्रकरण उकरुन काढणाऱ्यांची प्रकरणे उकरुन काढू, असा इशारा मंजिली कराड यांनी दिला होता.

Sachin Waghmare

Beed News : बीड जिल्हयातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर वातावरण चांगलेच तापले आहे. गेल्या दोन दिवसापासून या प्रकरणात वेगाने घडामोडी घडत असतानाच आता या प्रकरणात नवी अपडेट समोर येत आहे. वाल्मिक कराडला आरोपी करून मकोका लावला आहे. यामुळे कराड यांचे समर्थक आक्रमक झाले आहेत. वाल्मिक कराडची पत्नी मंजिली कराड यांनी पत्रकार परिषद घेत भाजप आमदार सुरेश धस यांना चॅलेंज देताना आपल्या पतीचे प्रकरण उकरुन काढणाऱ्यांची प्रकरणे उकरुन काढू, असा इशारा मंजिली कराड यांनी दिला होता. यानंतर आता सुरेश धस यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. माझ्या भगिनी केलेल्या आरोपांवर मी काही बोलणार नसल्याचे सापसात केले.

यावेळी प्रसारमाध्यमाशी बोलताना आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी विविध प्रश्नांना उत्तरे दिले आहेत. हे बघा मी त्या माऊलीबद्दल काय बोललो का? महिला आहे. त्यामुळे त्यांनी केलेल्या आरोपांवर मी काही बोलणार नाही. कोणताही पुरुष असेल त्याने माझ्यावर आरोप करावेत. लै धुतल्या तांदळासारखं आयुष्य मी जगलेलो आहे. माझे काही व्हिडीओ सापडणार नाहीत, अशी प्रतिक्रिया धस यांनी मंजिली कराड यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर दिली.

संतोष देशमुख यांची हत्या खंडणीला आडवा आला म्हणूनच झाली. हे मी नाही सांगत तर एसआयटी सांगत आहे. आम्ही राजकारणी काहीही बोलू, पण एसआयटी खरे बोलेल ना? एसआयटीच्या रिमांड अर्जात हेच म्हटले आहे की, खंडणीच्या आडवा आला म्हणून संतोष देशमुखला संपवले, असेही सुरेश धस यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

मी या आकावर कारण नसताना आरोप करीत नाही. या आकाकडे 17 मोबाईल होते. तुम्ही आता नाविन्यपूर्ण योजना सांगितली की, तो अमेरिकेहून धमकी देत होता. अमेरिकेचे सीम वापरत असेल. तो वापरत असेल. आका काय काय नाही करु शकत, आकाचा बाका 50-50 लोकांना प्रत्येक महिन्याला काहीतरी ठराविक लोकांना रक्कम पाठवत होता, असा दावा भाजप (BJP) सुरेश धस यांनी यावेळी केला.

या प्रकरणात एसआयटी व सीआयडीकडून सुरु असलेला तपास योग्य दिशने सुरु आहे. खंडणीला आडवा आला म्हणूनच संतोष देशमुख यांची हत्या झाली. हे मी नाही सांगत तर एसआयटी सांगत आहे. आम्ही राजकारणी काहीही बोलू, पण एसआयटी खरे बोलेल ना?, असेही आमदार धस म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT