Manoj Jarange Patil Sarkarnama
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil : 'सरकारशी चर्चेला तयार पण दार बंद केलं तर...'; मनोज जरांगेंचा इशारा

Manoj Jarange Patil On Hunger Strike Warns Government over Maratha Reservation : सरकारकडून टोलवा टोलवी झाली तर उद्या (शुक्रवार) सायंकाळी 5 वाजता पुढील दिशा सांगणार आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केले.

Roshan More

Maratha Aarkshan Hunger Strike : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तसेच 'सगेसोयरे'च्या अंमलबजावणीसाठी मनोज जरांगे उपोषण करत आहेत. आज (गुरुवार ) त्यांच्या उपोषणाचा सहावा दिवस आहे. त्यांची प्रकृती ढासळती आहे.

जरांगे पाटील यांना आज मंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ भेटणार आहे. त्यावर आपण सरकारशी चर्चेला तयार आहोत पण एकदा दार बंद केले तर उघडणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

मनोज जरांगे पाटील Manoj Jarange यांनी आपण आपल्या मागण्यांवर ठाम असल्याचे सांगितले आहे. चर्चेला येणारे काय चर्चा करणार हे माहीत नाही. नुसती चर्चा करून काय? आरक्षणाचा निर्णय तडीस निघणार आहे की नाही? असा थेट सवाल त्यांनी केला आहे.

उद्या आंदोलनाची दिशा ठरणार

चर्चा करणार आहोत. पण सरकारकडून टोलवाटोलवी झाली तर उद्या (शुक्रवार) सायंकाळी 5 वाजता पुढील दिशा सांगणार आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केले. ओबीसी OBC नेते लक्ष्मण हाके यांनी अंतरवाली सराटीत उपोषणाची परवानगी मागितली आहे.यावर मात्र बोलण्याचे जरांगे पाटील यांनी टाळले.

नेत्यांना काय सांगितले?

मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाला सुरुवात केल्यापासून त्यांना निवनिर्वाचित खासदार, नेते भेटण्यासाठी येत आहेत. या नेत्यांना मराठा आरक्षणाची बाजू लावून धरण्यास सांगत असल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले आहे. माझा जीव मराठा समाजात गुंतला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT