Devendra Fadnavis Manoj Jarange Patil sarkarnama
महाराष्ट्र

Manoj Jarange On SIT : एसआयटी चौकशीचा आदेश अन् जरांगेंनी फडणवीसांना केलं लक्ष्य; आव्हान देत म्हणाले...

Manoj Jarange Patil News : "व्हिडीओ कॉलवर काय काय बोलले, ते...", असंही जरांगे-पाटलांनी सांगितलं.

Akshay Sabale

राज्य विधिमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मनोज जरांगे-पाटील यांच्यावरून गदारोळ झाला. विधानसभेत आशिष शेलार यांनी मनोज जरांगे-पाटील यांच्या वक्तव्यावरून एसआयटी चौकशी करण्याची मागणी केली. ही मागणी मान्य करत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एसआयटी चौकशी करण्याचे निर्देश सरकारला दिले. यावरून मनोज जरांगे-पाटलांनी देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केलं आहे. तसेच, "न्यायचं त्या तुरूंगात न्या... चौकशी लावायची ती लावा," असं आव्हानच जरांगे-पाटलांनी सरकारला दिलं आहे.

मनोज जरांगे-पाटील ( Manoj Jarange Patil ) म्हणाले, "मी मराठ्यांचं काम करत असल्यानं ते सत्तेचा वापर करत आहेत. देवेंद्र फडणवीस आशिष शेलारांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी चालवत आहेत. मी कुठंच चुकीचं बोलत नाही आणि कुठंच गुंतत नाही. न्यायचं त्या तुरूंगात न्या.. चौकशी लावायची ती लावा.. आता बोलले, तर सलाइन घेऊन चौकशीला येतो."

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"पोलिसांनाही बडतर्फ करण्यात यावे"

"मला सगळ्यात जास्त फोन सरकारमधून आले आहेत. व्हिडीओ कॉलवर काय काय बोलले, ते मी सगळं समोर आणेल. आमच्याकडे रेकॉर्डिंग असेल, तर मी पण बघतो मग आता... सगळंच एकदा होऊ द्या. पोलिसांनाही बडतर्फ करण्यात यावे," अशी मागणी जरांगे-पाटलांनी केली आहे.

आशिष शेलार काय म्हणाले?

"महाराष्ट्राला बेचिराख करण्याची भूमिका घेतली जात आहे. संपवून टाकू, निपटून टाकू, बोलण्याची हिंमत जरांगेंमध्ये कशी आली? आधी छगन भुजबळ, मग उपमुख्यमंत्री आत मुख्यमंत्र्यांना धमकी दिली गेली. यामुळे जरांगेंच्या मागे कोण आहेत? ते समोर येण्यासाठी एसआयटी चौकशी करण्यात यावी," अशी मागणी आशिष शेलारांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT