Maharashtra Interim Budget 2024 : "छत्रपतींचं नाव घ्यायचं अन् शिवीगाळ करायची का?" फडणवीस आक्रमक; प्रश्नांचा भडीमार

Devendra Fadnavis On Manoj Jarange Patil Maharashtra Assembly : "मला जरांगे-पाटलांशी देणं-घेणं नाही, पण...", असेही फडणवीसांनी म्हटलं आहे.
Devendra Fadnavis | Manoj Jarange Patil
Devendra Fadnavis | Manoj Jarange Patil Sarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Assembly Interim Budget Session 2024 : मनोज जरांगे-पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शनिवारी ( 25 फेब्रुवार ) गंभीर आरोप केले होते. याचे पडसाद आज मंगळवारी ( 27 फेब्रवारी ) विधानसभेतही उमटले.

भाजप आमदार आशिष शेलार यांनी जरांगे-पाटलांच्या आंदोलनाची एसआयटीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी केली होती. ही मागणी लक्षात घेता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एसआयटी चौकशी करण्याचे निर्देश सरकारला दिले. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही सवाल उपस्थित केले आहेत.

Devendra Fadnavis | Manoj Jarange Patil
Eknath Shinde : "सामाजिक कार्यकर्त्यापर्यंत ठिक होतं, लिमिटच्या बाहेर गेलं की...", मुख्यमंत्री अन् पटोलेंचा व्हिडीओ व्हायरल

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, "विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्देशांचं निश्चितपणे पालन होईल. याविषयावर मला बोलण्याची इच्छा नव्हती. पण, महाराष्ट्राला मराठा समाजाबद्दल मी काय केलं, हे माहिती आहे. मी मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण दिलं. ते उच्च न्यायालयात टिकवलं. मुख्यमंत्री असेपर्यंत सर्वोच्च न्यायालयातही टिकवलं. सारथी सुरू केली, विद्यार्थ्यांना फीमध्ये सवलत दिली. अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाच्या माध्यमातून आर्थिक कर्जे दिली. एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) या योजना मजबूत केल्या."

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"त्यामुळे मराठा समाजाबद्दल मला कोणाच्याही प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. मी केलेलं काम मराठा समाजाला माहिती आहे. जरांगे-पाटलांच्या वक्तव्यानंतर मराठा समाज त्यांच्या नाहीतर माझ्या पाठीशी उभा राहिला. छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव घ्यायचं आणि लोकांच्या आया-बहिणी काढायच्या का? माझी जरांगे-पाटलांबद्दल तक्रार नाही. खरेतर यांच्या पाठीमागे कोण आहे, हे शोधावं लागेल," असं फडणवीसांनी म्हटलं.

Devendra Fadnavis | Manoj Jarange Patil
Ajay Baraskar News : जरांगेंना विरोध करणाऱ्या बारस्करांबाबत गावकऱ्यांनी घेतला 'हा' मोठा निर्णय

"अंतरवालीत पोलिसांच्या लाठीचार्जमुळे दगडफेक झाला असेलच... पण लाठीचार्ज का झाला? आता हे लक्षात येत आहे. रात्रीत जरांगे-पाटलांना आंदोलनस्थळी माघारी आणणारे कोण आहेत? घरात जाऊन भेटणारे कोण आहेत? कोणाकडे बैठक झाली, हे आरोपी सांगत आहेत. आपल्या पोलिसांना मारायचं आणि आपण गप्प राहायचं का?" असा सवालही फडणवीसांनी उपस्थित केला आहे.

Devendra Fadnavis | Manoj Jarange Patil
Eknath Shinde : "...म्हणून मुख्यमंत्री म्हणाले, मी कार्यक्रम करतो", शिंदे गटातील मंत्र्यांचं स्पष्टीकरण

"बीडची घटना शांततेत झाली नाही. मराठा समाजाने शांततेत मोर्चे काढले होते. पण, यावेळी ही शांतता नव्हती. कुठल्या स्तरावर आपले राजकारण चालू आहे? कुणाबरोबर त्यांचे फोटो समोर येत आहेत? कुणाचे कार्यकर्ते म्हणवून घेत आहेत? कुठून पैसे येत आहेत? हे सगळं बाहेर येत आहे.

अशाप्रकारे कुणाची आय-माय काढली जात असेल, मग तो विरोधी किंवा सत्ताधाऱ्यांमधील असो, आडे-वेडे न घेता हा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) ताकदीनं त्याच्यापाठीमागे ठामपणे उभा राहिल. एसआयटी चौकशी होईलच. पण, मला जरांगे-पाटलांशी देणं-घेणं नाही. त्यापाठीमागील बोलवता धनी शोधला पाहिजे," असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं.

"संभाजीनगर आणि पुण्यात वॉररूम कुणी उघडली, याची माहिती आमच्याकडे आहे. सगळी चौकशी करून हे षडयंत्र बाहेर काढलं जाईल," असं फडणवीसांनी ठामपणे विधानसभेत सांगितलं.

Devendra Fadnavis | Manoj Jarange Patil
Maharashtra Assembly Interim Budget Session 2024 LIVE : दरेकरांनी सभागृहात थेट शरद पवार, राजेश टोपेंचं नाव घेत केली मोठी मागणी...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com