मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यातील संवादाचा एक व्हिडीओ सोशल मीडियात मोठा व्हायरल झाला. त्यात पटोलेंशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी एकप्रकारे मनोज जरांगे-पाटील यांना लक्ष्य केल्याचं बोललं जात होतं. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांच्याबाबत संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. आता यावर मंत्री दीपक केसरकर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
नेमकं काय घडलं?
सोमवारी अर्थसंकल्पीय विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात झाली. विधिमंडळाचा कामकाज संपवून एका कार्यक्रमासाठी जाण्यासाठी मुख्यमंत्री ( Eknath Shinde ) निघाले. यावेळी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले तसेच अन्य काँग्रेस आमदारांची मुख्यमंत्र्यांशी भेट झाली. यावेळी हस्तांदोलन करून नाना पटोले-मुख्यमंत्री शिंदे यांच्यात चर्चा सुरू झाली.
"काय चाललंय राज्यात साहेब...?" असा प्रश्न नाना पटोलेंनी ( Nana Patole ) मुख्यमंत्री शिंदेंना केला. त्यावर "कुठलीही गोष्ट लिमिटच्या बाहेर गेली की, त्याचा कार्यक्रम करतो मी," असं विधान मुख्यमंत्री शिंदेंनी केलं होतं. त्यावर नाना पटोलेंनी म्हणाले, "मला एक सांगा, त्याचा डेअरिंग तुम्हीच वाढवलं ना..." यावर मुख्यमंत्र्यांनी म्हटलं, "सामाजिक कार्यकर्ता होता, तोपर्यंत ठिक होते..."
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मुख्यमंत्री शिंदे आणि नाना पटोलेंचा हा संवाद व्हायरल झाल्यावर संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या. मुख्यमंत्री शिंदेंनी मनोज जरांगे-पाटलांना उद्देशून हे वक्तव्य केल्याचं बोललं जात होते. काँग्रेसने ट्विट करून सवालही उपस्थित केला होता. आता याबाबत दीपक केसकरांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
दीपक केसरकर म्हणाले, "नाना पटोलेंना संजय राऊतांबद्दल विचारायचं होतं, की त्यांचं ( संजय राऊत ) काय चाललं आहे... तेव्हा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की, योग्यवेळ आली की कार्यक्रम करू... कारण तो कार्यक्रम कधीतरी होणं आवश्यक आहे. किती वाईट बोलावं याला मर्यादा असतात. अशा लोकांचा कार्यक्रम व्हायला लागतो. तो कार्यक्रम चोख उत्तर देऊन होऊ शकतो, असं मला वाटतं."
काँग्रेसनं काय ट्विट केलं?
काँग्रेसनं 'एक्स' अकाउंटवर ट्विट करत म्हटलं, "कार्यक्रम म्हणजे काय समजायचं साहेब? मुख्यमंत्री साहेब!, ही धमकी आहे का? उद्या जर जरांगे पाटलांचा जीव गेला तर मुख्यमंत्री जबाबदार असणार का?"
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.