Chhatrapati Sambhajinagar : शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’ करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून, आज शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी यांच्यासह 35 जणांनी प्राथमिक सदस्यत्वाचे राजीनामे दिले. त्यात प्रमुख पदाधिकाऱ्यांसह माजी नगरसेवकांचा समावेश आहे. हे पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जाते.
शिवसेना ठाकरे (Shivsena UBT) गटाला नुकत्याच झालेल्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीपासून गळती लागली आहे. पक्षाचे अनेक पदाधिकारी, माजी महापौर, माजी नगरसेवक शिवसेना शिंदे गट व भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. मराठवाडा विभागाचे सचिव अशोक पटवर्धन यांनी नुकताच शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यापूर्वी माजी महापौर नंदकुमार घोडेले, अनिता घोडेले यांनी त्यापूर्वी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला होता.
ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे, विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांच्या गटबाजीला वैतागलेल्या पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रमुख (Uddhav Thackeray) उद्धव ठाकरे यांच्या समोर खदखद व्यक्त केली होती. त्यानंतर दोघांमध्ये समेट घडवून आणण्यासाठी नुकताच मेळावाही घेण्यात आला. यावेळी यापुढे कोणीही शिवसेना सोडणार नाही, असा दावा करण्यात आला. पण आठच दिवसात हा दावा फोल ठरला आहे.
शिवसेना शिंदे गटाकडून उद्धवसेना कुमकूवत करण्याचे प्रयत्न सुरू असताना आता भाजपनेही जाळे टाकायला सुरुवात केली आहे. भाजपचे मंत्री अतुल सावे यांच्या पुर्व मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी यांच्यासह 35 जणांनी प्राथमिक सदस्यत्वाचे राजीनामे दिले. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना ठाकरे गटाला हा धक्का मानला जात आहे.
यांनी केला जय महाराष्ट्र!
विश्वनाथ स्वामी (शहरप्रमुख), शिव लुंगारे (उपजिल्हाप्रमुख), प्रकाश अत्तरदे (माजी नगरसेवक), साहेबराव घोडके, राजू खरे, सुदाम देहाडे, नागनाथ स्वामी (विभागप्रमुख), रोहिदास पवार (शाखा प्रमुख), प्रकाश हांडे, शिवशंकर स्वामी, मनोहर विखणकर, अजिंक्य देसाई, पंटू जाधव, मनोज नर्बदे, अनंत वराडे.
तसेच वसंत देशमुख, सुभाष नेमाने, रमेश गल्हाटे, गौतम भारस्कर, विट्ठल सोनवणे, तुकाराम घोडजकर, रवि बनकर, रोहित स्वामी, राहुल पाटील, योगेश चौधरी, बाबू स्वामी, आकाश बिडवे, निखिल पडूळ, चैतन्य जोशी, ऋषिकेश भालेराव, तुषार पाथरीकर, मयुरेश जाधव, रोहन स्वामी, सूर्यकांत मानकापे, आयुष शेंडगे, सर्वज्ञ पोपळे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.