Aditya Thackeray On Sanjay Shirsat News Sarkarnama
मराठवाडा

Aditya Thackeray On Sanjay Shirsat : चमचेगिरी करणाऱ्या संजय शिरसाट यांना भाव देत नाही; खैरेंना पक्षात येण्याची आॅफर दिल्याने आदित्य ठाकरे संतापले!

Aditya Thackeray expresses anger towards Sanjay Shirsat for offering a deal to Chandrakant Khaire. : राज्यात बहुमताचे सरकार आणि शिवसेना शिंदे गटाला काही महत्वाची मंत्री पद मिळाल्यानंतर या पक्षाकडे मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू झाले होते. विशेषतः मराठवाडा आणि छत्रपती संभाजीनगरात शिंदेसेनेने उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मोठे धक्के दिले होते.

Jagdish Pansare

Shivsena UBT News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष संपला, ती आता शिल्लक सेना आहे, पुढच्या विधानसभा निवडणुकीत हा पक्ष संपलेला असेल, अशी टीका सातत्याने शिंदेंची शिवसेना आणि भाजापकडून केली जात आहे. एकीकडे मिशन टायगरमधून उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे खासदार फोडण्याचा प्रयत्न सुरू आहे, तर दुसरीकडे निष्ठावंत शिवसेना नेत्यांना पक्षात येण्याच्या आॅफर दिल्या जात आहेत. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांना शिंदेसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी रामनवमीच्या निमित्ताने पक्षात येण्याची खुली आॅफर दिली होती.

अर्थात खैरे यांनी ती नाकारत आपण उद्धव ठाकरे यांच्यासोबतच कायम राहणार, असल्याचे स्पष्ट केले. या संदर्भात मुंबईत आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना माध्यमांनी विचारले असता, त्याचा पारा चांगलाच वाढला. गेली कित्येक वर्ष चमचेगिरी करत आमच्याकडे इकडून-तिकडे फिरणाऱ्यांना आम्ही भाव देत नाही, तुम्ही पण देऊ नका, आम्ही अशा दलालांना किमंत देत नाही, अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी शिरसाट यांना सुनावले.

शिवसेनेत तीन वर्षापुर्वी फूट पडल्यानंतर आज राज्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठी गळती लागली आहे. (Sanjay Shirsat) लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि शिवसेनेला चांगले यश मिळाले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत याच यशाची पुनरावृत्ती होऊन पक्षाला 'अच्छे दिन' येतील, या अपेक्षेने उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला लागलेली गळती थांबली होती. पण विधानसभा निवडणुकीत महायुतीने जोरदार मुसंडी मारली आणि 232 आमदार निवडून आणले.

महाविकास आघाडी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी हा मोठा धक्का होता. राज्यात बहुमताचे सरकार आणि शिवसेना शिंदे गटाला काही महत्वाची मंत्री पद मिळाल्यानंतर या पक्षाकडे मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू झाले होते. विशेषतः मराठवाडा आणि छत्रपती संभाजीनगरात शिंदेसेनेने उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मोठे धक्के दिले होते.

माजी महापौर यांच्यासह दहा नगरसेवक आणि काही पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांना जय महाराष्ट्र केल्यानंतर आता मंत्री संजय शिरसाट यांनी थेट शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनाच गळ टाकायला सुरूवात केली. चंद्रकांत खैरे यांनी मात्र शिरसाट यांना प्रतिसाद दिला नाही. उलट आम्ही पुन्हा येणार असे म्हणत 2029 च्या विधानसभा निवडणुका आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली होऊन तेच राज्याचे मुख्यमंत्री होतील, असा विश्वास खैरे यांनी व्यक्त केला.

या पार्श्वभूमीवर मुंबईत आदित्य ठाकरे यांना माध्यमांनी संजय शिरसाट यांनी खैरे यांना पक्षात येण्यासाठी दिलेल्या आॅफर संदर्भात छेडले. त्यावर लालबूंद झालेल्या आदित्य ठाकरे यांनी संजय शिरसाट यांचा थेट चमचेगिरी करणारा, दलाला असा उल्लेख केला. तसेच आपण अशा चमचेगिरी करत इकडून-तिकडे फिरणाऱ्या दलालांना भाव देत नाही, असे म्हटले आहे.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT