Shivsena UBT News : शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांची डिमांड सध्या चांगलीच वाढली आहे. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी काल रामनवमीच्या मुहूर्तावर खैरे यांचे तोंडभरून कौतुक केले. एवढेच नाही तर त्यांच्यासाठी आमच्या पक्षाचे दरवाचे कायम खुले असल्याचे सांगत पक्षात येण्याची आॅफरही दिली. पण संजय शिरसाट यांच्याआधी लोकसभा निवडणुकी दरम्यान, खैरे यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून पक्ष प्रवेशासाठी विचारणा झाली होती, असे चंद्रकांत खैरे यांनी म्हटले आहे.
शिवसेनेचे शाखाप्रमुख, नगरसेवक, महापालिकेत विरोधी पक्षनेता, दोनवेळा आमदार, चारवेळा, खासदार राज्यातील युती सरकारमध्ये मंत्री आणि शिवसेनेते उपनेते आणि आता नेते असलेल्या चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांची चर्चा अचानक नव्याने सुरु झाली आहे. 2019-2024 अशा सलग दोन लोकसभा निवडणुकीत चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाला. तरी देखील त्यांची पक्षनिष्ठा, प्रदीर्घ राजकीय अनुभव आणि दांडगा जनसंपर्क पाहता शिंदेंच्या शिवसेनेला खैरे आपल्याकडे असावे, असे वाटू लागले आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष (Shivsena UBT) निम्मा रिकामा झाला आहे. येणाऱ्या काळात महापालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुकी दरम्यान, आणखी काही पदाधिकारी, शिवसैनिक शिंदेसेना किंवा भाजपमध्ये जाऊ शकतात. अशावेळी चंद्रकांत खैरे यांना आपल्याकडे खेचण्याचे प्रयत्न विशेषतः शिंदेंच्या शिवसेनेकडून सुरू आहेत. भाजपातून विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षप्रवेश करून उमेदवारी पदरात पाडून घेतल्या राजू शिंदे यांनी पराभवानंतर शिवसेनेला जय महाराष्ट्र केला.
आपल्या राजीनामा पत्रात शिंदे यांनी खैरेंबद्दल नाराजी व्यक्त केली. एवढेच नाही तर जाहीर पत्रकार परिषद घेऊन खैरे यांच्यावर गंभीर आरोप केले. खैरे-शिंदे वादातून दानवे विरुद्ध खैरे असे या वादाला वळण लागले. तसे पाहिले तर अंबादास दानवे- चंद्रकांत खैरे यांच्यातील पक्षांतर्गत संघर्ष खूप जुना आहे. त्यात नव्याने शिंदे यांच्या पक्ष सोडून जाण्याने भर पडली एवढेच.
शिवसेनेत दुखावलेले चंद्रकांत खैरे यांना आॅफर देण्याची हीच योग्य वेळ असल्याचे हेरत संजय शिरसाट यांनी त्यांना गळ टाकला. पण मी बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक आहे, मी उद्धव ठाकरेंची साथ सोडणार नाही, असे खैरे यांनी ठामपणे सांगतिले. आपल्या गृहमंत्री अमित शहा यांच्याकडूनही यापुर्वी विचारणा झाली होती, असेही खैरे यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले. एकूणच चंद्रकांत खैरे यांची डिमांड सध्या वाढल्याचे दिसून येत आहे.
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.