Chandrakant Khaire News : पुढच्या विधानसभा निवडणुका आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात, तेच मुख्यमंत्री होतील! चंद्रकांत खैरेंचा दावा

Chandrakant Khaire claims Aditya Thackeray will be the next Chief Minister, with assembly elections taking place under his leadership. : शेतकऱ्यांना कर्जमाफी, शेतमालाला हमी भाव, लाडक्या बहीणींना 2100 रुपये अनुदान या निवडणुक प्रचारात दिलेल्या आश्वासनांचा सरकारला विसर पडला आहे.
Chandrakant Khaire-Aditya Thackeray News
Chandrakant Khaire-Aditya Thackeray NewsSarkarnama
Published on
Updated on

Shivsena UBT News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हाच खरा निष्ठावंतांचा पक्ष आहे. 2029 मध्ये युवानेते आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली विधानसभेच्या निवडणुका आम्ही लढवू आणि जिंकू. आदित्य ठाकरे हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, असा दावा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. अमेरिकत अध्यक्ष ट्रम्प यांच्याविरोधात जशी जनता रस्त्यावर उतरली आहे, असेच चित्र आपल्या देशात लवकरच दिसेल, असा इशाराही खैरे यांनी दिला.

वक्फ सुधारणा विधेयकाच्या विरोधात लोकसभा आणि राज्यसभेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या (Shivsena UBT) खासदारांनी मतदान केले. तेव्हापासून उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेला महायुतीकडून टार्गेट केले जात आहे. उद्धव ठाकरे यांचा जनाब असा उल्लेख करत त्यांनी हिंदुत्व सोडले, सत्तेसाठी मुस्लिमांचे लांगूनचालन सुरू केले, असा आरोप सातत्याने केला जातोय.

या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी आदित्य ठाकरे हे 2029 च्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री होतील, असे धाडसाचे विधान केले. राज्यातील महायुती सरकारविरोधात सर्वसामान्य जनतेच्या मनात रोष आहे. शेतकरी, बेरोजगार तरुण, महिला, लाडक्या बहीणी, विद्यार्थी अशा सर्वांचीच फसवणूक झाली आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी, शेतमालाला हमी भाव, लाडक्या बहीणींना 2100 रुपये अनुदान या निवडणुक प्रचारात दिलेल्या आश्वासनांचा सरकारला विसर पडला आहे.

Chandrakant Khaire-Aditya Thackeray News
Chandrakant Khaire On Sanjay Shirsat : चंद्रकांत खैरेंची डिमांड वाढली, शिरसाट यांच्याआधी अमित शहा यांनीही दिली होती आॅफर!

आता राज्याची आर्थिक परिस्थिती नाही, असे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री सांगत आहेत. जनतेला हा ढोंगीपणा दिसतो आहे. 2029 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जनता महायुतीच्या मनमानी कारभाराला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. शिवसेना संपली, पुढच्या निवडणुकीत आमचा पक्ष दिसणार नाही, असं सांगणाऱ्यांचे दात युवानेते आदित्य ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे निष्ठावंत शिवसैनिकांच्या बळावर घशात घालतील.

Chandrakant Khaire-Aditya Thackeray News
Aditya Thackeray News : 'कचऱ्यावर आपण लक्ष देत नाही', नारायण राणेंच्या दाव्यावर ठाकरेंचा पलटवार

आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही विधानसभेच्या निवडणुका लढवू आणि जिंकू. आदित्य ठाकरे हेच राज्याचे पुढचे मुख्यमंत्री होतील, या पुनरुच्चारही चंद्रकांत खैरे यांनी केला. मनमानी कारभार केला तर जनता उद्रेक करते, अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याविरोधात तो दिसतो आहे. तेथील अनेक राज्यातील लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. अशी परिस्थिती आपल्या देशाता निर्माण झाली तर नवल वाटायला नको, अशी टीकाही खैरे यांनी केंद्रातील मोदी सरकारवर केली.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com