Nanded News : नांदेडच्या राजकीय भूमीवर नव्याने पायाभरणी करण्याचा संकल्प राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. नांदेड जिल्हयात येत्या काळात पक्षवाढीची जबाबदारी नांदेमधील एकमेव आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यावर सोपवली आहे. नांदेडच्या भूमीवर पाऊल ठेवताच पहिल्यांदा अजितदादांनी मोठी घोषणा केली आहे. त्यामुळे आमदार चिखलीकर समर्थकांत उत्साहाचे पसरले आहे.
आमदार चिखलीकर यांच्या पुढाकारातून नांदेड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश करणाऱ्याचा ओढा वाढला आहे. नांदेड जिल्ह्यातील काँग्रेसचे माजी आमदार मोहन हंबर्डे आणि त्यांचे शेकडो समर्थक तसेच नाईक घराण्याशी संबंधित याच पक्षाच्या माजी जिलहा परिषद अध्यक्ष वैशाली चव्हाण, माजी नगरसेवक गफार खान यांनी शुक्रवारी अजित पवार यांच्या उपस्थित पक्षप्रवेश केला.
यावेळी अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रताप पाटील चिखलीकर यांच्या कामाचे कौतुक केले. सर्वांना बरोबर घेऊन काम करणारा नेता असल्याची प्रशस्ती देतानाच आता आणि पुढील काळात घड्याळासोबतच रहा, असा वडिलकीचा सल्लाही त्यांनी दिला. भविष्यात वेगळी संधी देण्याचे संकेत देताना त्यांनी पुढील काळात मंत्रिपदाची संधी देण्यात येईल, असे सूचित केले.
नांदेडमध्ये शुक्रवारी झालेल्या कार्यक्रमामध्ये उपस्थित कार्यकर्त्यांना पक्ष बळकट करण्याची तसेच पुढील काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत चांगला निकाल देण्याची अट घालत तुमच्या मनामध्ये जे आहे, ते होईल असे पवार यांनी भाषणाच्या शेवटी जाहीर केल्यानंतर टाळ्यांचा कडकडाट झाला. अजितदादांनी केलेल्या या घोषणेमुळे कार्यकर्त्यात उत्साहाचे वातावरण आहे.
नांदेड जिल्हा सुरुवातीपासून काँग्रेसचा बाल्लेकिल्ला राहिला आहे. या ठिकाणी अशोक चव्हाण यांचे वर्चस्व राहिले आहे. प्रताप चिखलीकर यांनी नेहमीच चव्हाण यांच्या विरोधातील पक्षात राहिले आहेत. मात्र, वर्षभरापूर्वी अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्याने चव्हाण व चिखलीकर सहा महिने भाजपमध्ये एकत्र होते. मात्र, लोकसभा निवडणुकीत भाजपकडून निवडणूक लढताना चिखलीकर यांना पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर चिखलीकर यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करीत विजय मिळवला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.