Tanaji Sawant News : माजी मंत्री तानाजी सावंतांचा आरोग्य विभागातील नवा घोटाळा; 70 कोटींच्या कामासाठी 3190 कोटी

Political News : प्राथमिक आरोग्य केंद्रात यांत्रिकी पद्धतीने साफसफाई करण्यासाठी जी काम पूर्वी वार्षिक 70 कोटी रुपयांमध्ये होत होती, त्या कामासाठी तानाजी सावंत यांनी 3 हजार 190 कोटी रुपये मर्जीतल्या एका कंपनीला दिल्याचे उघड झाले आहे.
Tanaji Sawant News
Tanaji Sawant NewsSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी यांत्रिकी साफसफाईच्या कामात कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा प्रकार समोर आला आहे. राज्यातील सर्व सरकारी रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात यांत्रिकी पद्धतीने साफसफाई करण्यासाठी जी काम पूर्वी वार्षिक 70 कोटी रुपयांमध्ये होत होती, त्या कामासाठी तानाजी सावंत यांनी 3 हजार 190 कोटी रुपये मर्जीतल्या एका कंपनीला दिल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे माजी मंत्री तानजी सावंत यांच्या समोरील अडचणी वाढल्या आहेत.

तानजी सावंत (tanaji Sawant) यांनी ज्या कंपनीला हे काम दिले होते, त्या कंपनीला यांत्रिकी साफसफाईच्या कामाचा कोणताही अनुभव नव्हता. इतकेच नाही तर मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठराव मंजूर झाला नसताना तो झाल्याचे भासवून कार्यादेश काढला गेला असल्याचा प्रकार पुढे आला आहे. त्यासोबतच या कामासाठी निधी उपलब्ध नसताना देखील हे काम मर्जीतल्या एका कंपनीला देण्यात आले होते.

Tanaji Sawant News
Shivsena UBT Vs BJP : "सभेत दाखवण्यापुरती रुद्राक्षांची माळ अन् तोंडी औरंगजेबाचा..." छावा सिनेमा, महाकुंभचा उल्लेख करत भाजपचा ठाकरेंवर हल्लाबोल

राज्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये स्वच्छतेसाठी 2022-23 ते 2024-25 या तीन वर्षांसाठी 'मेकॅनाइझ्ड क्लीनिंग सर्व्हिसेस'साठी पुण्यातील बीएसए कॉर्पोरेशन लिमिटेडशी करार करण्यात आला होता. या कराराला त्यावेळी विरोध झाला होता. ठेकेदाराला हजारो कोटी रुपयांचा फायदा करून देणारा हा करार आहे, अशी टीका झाली होती. विशेष म्हणजे हा ठराव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर झालेला नव्हता, मात्र मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्याचे भासवून कार्यारंभ आदेश काढण्यात आला होता.

Tanaji Sawant News
Uddhav Thackeray meeting : उद्धव ठाकरेंच्या बैठकीला दोन आमदार गैरहजर; स्वतःच सांगितले 'हे' कारण

हा करार झाला त्यावेळी तानाजी सावंत हे आरोग्यमंत्री होते, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते. 2024 च्या विधानसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री झाले. 'मेकॅनाइझ्ड क्लीनिंग सर्व्हिसेस'चा करार करताना नियमांचे उल्लंघन करण्यात आले होते. कामासाठी ठेकेदाराला कितीतरी पटींनी अधिक रक्कम दिली जाणार होती. ही बाब मुख्यमंत्री फडणवीस यांच्या लक्षात आली. त्यानंतर त्यांनी या निविदेची अंमलबजावणी थांबवण्याचे आदेश दिले होते. हा शिवसेना, तानाजी सावंत यांच्यासाठी मोठा दणका मानला जात आहे.

Tanaji Sawant News
Shivsena UBT Meeting : उद्धव ठाकरे कॉंग्रेस, शरद पवारांवर टाकणार मोठा डाव; विरोधी पक्षनेतेपदासाठी 'ही' तीन नावे चर्चेत

शासकीय रुग्णालयांमध्ये ही स्वच्छता सेवा सुरू करण्यासाठी आरोग्य सहसंचालक, रुग्णालय कक्षामार्फत आदेश देणे गरजेचे असतानाही परस्पर आदेश देण्यात आले होते. त्यामुळे निविदेची अंमलबजावणी थांबवण्यासाठी जारी करण्यात आलेल्या आदेशात म्हटले आहे. 18 फेब्रुवारी रोजी हा आदेश जारी करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, हा करार करताना त्यासाठी आवश्यक असलेला निधी उपलब्ध आहे किंवा नाही, याचाही विचार केला गेला नाही. निधी उपलब्ध नसतानाही करार केल्याचे उघड झाले आहे.

Tanaji Sawant News
Mahayuti News : विधिमंडळ सदस्य नियुक्तीत भाजपची आघाडी तर मित्रपक्षांच्या वाट्याला अद्याप प्रतीक्षाच!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com