Dhananjay Mundhe, Dr. Pritam Mundhe, Amarsinh Pandit Sarkarnama
मराठवाडा

Beed Loksabha : 'या' कारणामुळे बीड लोकसभेवर अजित पवार गटाचा दावा...

NCP Ajit Pawar group claims : जिल्ह्यात आमदार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दादा गटाची ताकद अधिक ; सध्या भाजपच्या डॉ. प्रीतम मुंडे खासदार...

Datta Deshmukh

Beed Loksabha : बीड जिल्ह्यात आमचे चार आमदार असून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील आमचीच ताकद अधिक असल्याने महायुतीत बीडच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने दावा सांगितला आहे. याठिकाणी सध्या भाजपच्या डॉ. प्रीतम मुंडे खासदार आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात भाजपने यावेळी मिशन 45 चे लक्ष ठेवले आहे.

तरी महायुतीतल्या घटक पक्षांना देखील जागा सोडण्याबाबत सकारात्मकता दाखविली आहे. महायुतीचे जागावाटप देखील अंतिम टप्प्यात आहे. मराठवाड्यातील 8 लोकसभा मतदार संघांपैकी भाजप 4 तर शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार (Ajit Pawar) गट प्रत्येकी 2 जागा लढवतील, अशी माहिती आहे.

अनेक वर्षांपासून भाजपचे वर्चस्व असलेल्या या मतदारसंघावर महायुतीत राष्ट्रवादी अजित पवार गटाने दावेदारी केली आहे. यासाठी राष्ट्रवादीने राजकीय ताकदीचा मुद्दा पुढे केला आहे. सध्या जिल्ह्यातील 6 विधानसभा मतदार संघापैकी 3 मतदारसंघ राष्ट्रवादीकडे असून भाजपकडे दोनच आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका व नगरपंचायतींवर राष्ट्रवादीचेच प्राबल्य अधिक आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्यामुळे बीडची जागा राष्ट्रवादीला सोडावी, असा आग्रह धरला जात आहे. महायुतीत मोठा पक्ष असलेल्या भाजपला मित्रपक्षांना जागा तर सोडाव्या लागणारच आहेत. मात्र, सलग चार निवडणुकीत पक्षाने जिंकलेली व विद्यमान भाजप खासदार असलेली जागा कशी सोडायची हा पेच देखील भाजपसमोर आहे.

पण, आपल्या राजकीय ताकदीचा मुद्दा पुढे करत राष्ट्रवादी देखील आपल्या दावेदारीवर ठाम आहे. दरम्यान, राष्ट्रवादीत फूट पडण्यापूर्वी या पक्षाकडून माजी आमदार अमरसिंह पंडित यांचे नाव लोकसभेसाठी चर्चेत होते. आताही पक्षातील नेते अमरसिंह पंडित यांचे नाव पुढे करत आहेत.

मात्र, पालकमंत्री धनंजय मुंडे यांची भूमिका देखील राष्ट्रवादीच्या दावेदारीच्या मांडणीत सर्वात महत्वाची ठरणार आहे. अलीकडे त्यांचे व पंकजा व डॉ. प्रीतम मुंडे यांच्यातील कौटुंबिक नाते पूर्वीप्रमाणे सुरळीत झाले आहे. पण, राज्यपातळीवर राष्ट्रवादी देखील आपल्याला जागा सोडावी यासाठी आग्रही आहे.

(Edited by Amol Sutar)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT