Kolhapur News: राज्याच्या राजकारणाचा आजचा सर्वात मोठा दिवस आहे. अपात्र आमदाराच्या निर्णयानंतर राज्याच्या इतिहासातील सर्वात मोठा ऐतिहासिक दिन म्हणून या दिवसाकडे पाहिले जाणार आहे. सत्ता निवाड्याचा आजचा शेवटचा दिवस असून अनेक राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्र्यांची तातडीची बैठक आणि विधानसभा अध्यक्ष यांनी मुख्यमंत्री यांची घेतलेली भेट यावरून काल दिवसभर आरोप प्रत्यारोपांचा खेळ रंगला. अशा परिस्थितीत आज काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी आजच्या सत्ता निवाड्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
अँटी डिफेक्शन कायदा बळकट करायचा असेल, तर आजचा निर्णय योग्य लागायला हवा.विधिमंडळाचा अधिकार अबाधित ठेवायचा असेल तर अध्यक्षांनी योग्य निर्णय घ्यावा. आज निर्णय चुकीचा घेतला तर सुप्रीम कोर्टात न्याय मिळेल, मग विधिमंडळातील सर्वच निर्णय कोर्टात जातील. लोकशाही बळकट करायची असेल तर अध्यक्षांनी योग्य निर्णय द्यायला हवा, असे मत काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केले.
विधानसभा अध्यक्ष हे सर्वोच्च पद आहे. अध्यक्षांनी मुख्यमंत्री यांना भेटायचं टाळायला हवं होतं. खुर्चीची गरिमा टिकवण्यासाठी त्यांनी ती काळजी घ्यायला पाहिजे होती. संपूर्ण देशाचा या निकालावर लक्ष आहे. हा निर्णय फक्त विधान सभेसाठी मर्यादित नाही. तर जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत या सर्वावर त्याचे परिणाम होतील, असंही पाटील यांनी सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या तातडीच्या बैठकीवर बोलताना, राज्यातील वातावरणाबद्दल त्यांना काहीतरी फीडबॅक मिळाला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी रात्री तातडीची बैठक घेतली असण्याची शक्यता आहे. राज्यात आज कायद सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल का ? याबद्दल कालच्या बैठकीत चर्चा झाली असेल, अशी शक्यता सतेज पाटील यांनी व्यक्त केले.
Edited by: Mangesh Mahale
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.