Pankaja Munde Sarkarnama
मराठवाडा

Pankaja Munde : अजितदादानंतर आता पंकजा मुंडेंही कडाडल्या; म्हणाल्या, 'त्यांना थेट फाशीची शिक्षा... '

Pankaja Munde statement News : जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर बीडचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी डीपीडीसी बैठकीच्यावेळी कडक शब्दांत कानउघडणी केली आहे.

Sachin Waghmare, सरकारनामा ब्युरो

Beed News : केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येवरून बीड जिल्ह्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. गेल्या काही दिवसात बीडमधील अनेक गुन्हेगारीच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर बीडचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी डीपीडीसी बैठकीच्यावेळी कडक शब्दांत कानउघडणी केली आहे. त्यानंतर पर्यावरण मंत्री पकंजा मुंडे यांनीही कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत.

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी कडक शब्दात सुनावले. 'जर कुणी खंडणी मागितली तर, मी त्याला मकोका लावायला मागे-पुढे पाहणार नाही”, असा इशारा अजित पवार यांनी दिला. त्यानंतर पर्यावरण मंत्री पकंजा मुंडे म्हणाल्या, 'कुठेही अशाप्रकारची घटना घडणं चूक आहे. यामध्ये जे कोणी गुन्हेगार आहेत, त्यांना थेट फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे.'

बीडमधील डीपीडीसीच्या बैठकीनंतर पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी थेट विधान केले. “ परळी, परळी करु नका. तुमचा फोकस परळीकडे आहे. यात जे कोणी गुन्हेगार आहेत, त्यांना थेट फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे. माझ्याकडे माहिती आलेली आहे. कोणत्या मतदारसंघात काय घडत आहे, याची संपूर्ण माहिती आहे.'

उपमुख्यमंत्री अजितदादांनी सांगितल्याप्रमाणे या जिल्ह्यात अनेक उद्योग येण्यास इच्छुक आहेत, पण एखाद्या घटनेमुळे किंवा दुर्देवी प्रसंगामुळे आपल्या जिल्ह्याची प्रतिमा डागळायला नको. ते उद्योग दूर जायला नको, असेही त्या म्हणाल्या.

मी पालकमंत्री असल्यापासून येथे विमानतळ व्हावं यासाठी मीदेखील प्रयत्न करत होते. पण जेव्हा शासनाने शासकीय जागा हवी असा निर्णय घेतला आणि तेवढी शासकीय जागा एकाच ठिकाणी मिळणं हा प्रश्न होता. तो प्रश्न कसा सोडवायचा असे अजित दादांना विचारले. त्यावर त्यांनी आपण हा प्रश्न मार्गी लावू असे सांगितले असल्याचे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT