Ajit Pawar : अजित पवारांनी तीन आमदारांची भेट नाकारली..काय आहे कारण?

Ajit Pawar Denied Meeting Three MLAs of Raigad : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी तीन आमदारांची भेट नाकारली..काय आहे कारण?
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा वाद विकोपाला गेला आहे. हा वाद अजूनच चिघळण्याची शक्यता आहे. रायगडचा पालकमंत्री पदाचा तिढा अद्यापही थांबायचे नाव घेत नाही. अशातच रायगडमधील शिवसेनेचे आमदार भरत गोगावले, महेंद्र थोरवे, महेंद्र दळवी अजित पवारांच्या भेटीसाठी गेले होते. मात्र मंत्रालयाच्या दारातूनच त्यांना परत फिरावे लागले. अजित पवारांनी रायगडच्या तीन आमदारांची भेट नाकारली आहे. भेट झाली नसली तरी गोगावलेंनी पालकमंत्रिपदावर दावा कायम ठेवला आहे. येत्या दोन दिवसांत रायगडच्या पालकमंत्रिपदाचा निर्णय होणार असल्याचं भारत गोगावलेंनी सांगितलं

रायगडच्या पालकमंत्रिपदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये (NCP) जोरदार रस्सीखेच सुरु आहे. समोर आलेल्या माहितीनुसार रायगडचं पालकमंत्रीपद आदिती तटकरे भरत गोगावले यांच्यात विभागून देण्याची चाचपणी सुरू आहे. गोगावलेंनी मात्र आपला दावा कायम ठेवत रायगड आणि संपूर्ण कोकणात शिवसेनेची ताकद असल्याने शिवसेनेच्या आमदारांनी पालकमंत्रिपद शिवसेनेलाच मिळायला हवं, अशी मागणी केली आहे.

Ajit Pawar
Niti Aayog Report On Maharashtra : महायुतीच्या दाव्यांचा अखेर निती आयोगाकडून भांडाफोड; महाराष्ट्राची सहाव्या स्थानावर घसरगुंडी

फडणवीसांनी केलेल्या पालकमंत्रीपदाच्या घोषणेनंतर शिवसेनेच्या विरोधामुळे अवघ्या काही तासात आदिती तटकरेंच्या नावाला स्थगिती देण्याचा निर्णय सरकारला घ्यावा लागला. 26 जानेवारी प्रजासत्ताकदिनाचं ध्वजवंदन आदिती तटकरेंच्या हस्ते पार पडल्यानंतर आता शिवसेना (Shivsena) अधिकच आक्रमक झालीये.

Ajit Pawar
Local Body Election : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत भाजप खासदाराचे मोठे भाष्य; कोल्हापूरच्या हद्दवाढीचेही दिले संकेत

रायगड जिल्हा पालकमंत्र्यांच्या प्रतीक्षेत आहे. पालकमंत्रीपद आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांना मिळाल्यानंतर शिंदे गटाच्या भरत गोगावले समर्थकांनी प्रचंड विरोध केला. त्यामुळे पालकमंत्री पदाला स्थगितीमुळे सध्या रायगड जिल्हा पालकमंत्र्यांच्या प्रतीक्षेत आहे. सध्या पालकमंत्री पदावरून आरोप प्रत्यारोपाच्या फैऱ्या झाडल्या जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com