Injured PA Amrit Davkar receiving treatment after the violent assault near Amarsingh Pandit’s residence during the Georai municipal election clash, where he alleged a murder conspiracy. Sarkarnama
मराठवाडा

Amarsinh Pandit : माजी आमदार अमरसिंह पंडितांच्या हत्येचा होता 'कट', गेवराईतील राड्यात जखमी 'पीए'चा खळबळजनक दावा

Beed Politics : गेवराईतील राड्यात माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या पीए अमृत डावकर यांच्यावर गंभीर हल्ला झाला. त्यांचा दावा - पंडित यांच्या हत्येचा कट होता; चालकामुळे जीव वाचला.

Datta Deshmukh

Marathwada Politics : गेवराई नगरपालिका निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या हत्येचा कट होता. आपण उभा असताना अचानक येत टोळक्याने आपल्याला गंभीर मारहाण केली. आपलाही खून झाला असता मात्र चालकमध्ये आल्याने आपण बचावलो, असा, दावा पंडित यांचे स्वीय सहाय्यक अमृत डावकर यांनी केला.

मंगळवारी (ता. 2) गेवराईत पवार व पंडितांच्या गटांत वाद झाला. यानंतर एका टोळक्याने पंडितांच्या कृष्णाई बंगल्यावर चालून येत या ठिकाणी असलेल्या अमृत डावकर यांना बेल्ट, लाथा आणि दांडक्याने मारहाण केली. यामध्ये डावकर यांच्या डाव्या डोळ्याला इजा झाली असून त्यांच्या हातावर आणि पाठीवर मारहाणीच्या जखमांचे व्रण आहेत. त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.

आपल्याला मारहाण करणारे माजी आमदारांचे भाऊ इतर पाच सहा जणांसह पोचले. आलेले सर्वजण अमरसिंह पंडित यांच्या खुनाचा कट रचूनच आले होते. माजी आमदारांचे बंधू खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगून आलेले आहेत. त्यामुळे त्यांच्यासोबतचे लोकही गुंड प्रवृत्तीचे होते.

त्यांनी आपले वाहन कार्यालयावर आदळले. त्यानंतर, तिथे आल्यानंतर अमरसिंह पंडित यांना संपवून टाकायचं असे घोळक्यातील लोक म्हणत होते. अमरसिंह पंडित इथे नाहीत म्हणून मला संपवून टाकू, असेही हल्लेखोर म्हणत होते असा आरोप अमृत डावकर यांनी केला.

तत्कालीन शिवसेना तालुकाप्रमुखाच्या खुन प्रकरणात न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावलेला व्यक्ती आणि शिक्षा भोगलेला व्यक्ती कारागृहाच्या बाहेर आला तरी त्याचे वर्तन कसे असेल? असे डावकर म्हणाले. आपल्याला बचाव करण्याची संधीही दिली नाही. आपलाही खून झाला असता मात्र, चालकमध्ये आल्याने आपण सुदैवाने बचावल्याचे अमृत डावकर म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT