Ambadas Danve  Sarkarnama
मराठवाडा

Danve Attacked BJP : ‘मोदींच्या महिला सबलीकरणाच्या गप्पा अन् त्यांचे भक्त महिलांना मारहाण करतात...’

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar : महाराष्ट्रातील ढासळती कायदा-सुव्यवस्था आणि राजरोसपणे गोळीबार आणि त्यातून पडणारे मुडदे, या मुद्द्यावरून महाविकास आघाडी विशेषतः ठाकरेंची शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे. पुण्यात शुक्रवारी निर्भय बनो कार्यक्रमाला जाणाऱ्या ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर भाजपच्या कार्यकर्त्यांनी हल्ला चढवला. यामध्ये काही महिलांनाही मारहाण झाल्याचा आरोप केला जात आहे. (Ambadas Danve Attacked BJP over Attack on Nikhil Wagle)

नेमकं यावर बोट ठेवत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला चढवला. पंतप्रधान मोदी महिला सबल करण्याच्या गप्पा करतात आणि त्यांचे भक्त हे महिलांना मारहाण करतात. गुंड केवळ मंत्रालयात नाहीत, तर आता पुण्याच्या रस्त्यावरही दहशतीचे दर्शन घडवू लागले आहेत. गुन्हा दाखल करण्याचे काम झाले असेल, पण किती कार्यकर्त्यांना अटक झाली? हे सांगा... फडतूसपणा बंद करा... (Danve Attacked BJP)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर हल्ला करीत असताना त्यांच्या संरक्षणासाठी सरसावलेल्या भक्ती कुंभार आणि इतर भगिनींनादेखील भाजपच्या गुंडांनी मारहाण केल्याचे सांगणारा हा व्हिडिओ, तुमच्या माहितीस्तव, असे म्हणत दानवे यांनी आपल्या एक्स अकाउंटवरून शेअर केला आहे. राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गुंडाराज आणि अंधाराज सुरू असल्याचेही दानवे यांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे.

शिवसेनेचे मुंबईतील माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. यावरून संतप्त झालेल्या ठाकरे गटाने गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यावर उद्या गाडी खाली कुत्र्याचे पिल्लू मेले तरी ते माझा राजीनामा मागतील, असे विधान फडणवीसांनी कले होते. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनीही फडणवीसांवर रोखठोक टीका केली होती. राज्यातील गोळीबाराच्या घटना, खून, मारहाणीसारख्या घटनांमुळे शिवसेना-भाजप-राष्ट्रवादीच्या ट्रीपल इंजिन सरकारवर सध्या चौफेर टीका होत आहे.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT