Shivsena Nirdhar Melawa News : नाशिक येथे आयोजित शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या निर्धार मेळाव्यात शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी पक्ष सोडून गद्दार गटात गेलेल्याचे कसे हाल सुरू आहेत, याकडे सगळ्यांचे लक्ष वेधले. बटीक होऊन काम करण्यापेक्षा स्वाभिमानाची चतकोर भाकर खाल्लेली बरी, असे आवाहनही त्यांनी उपस्थिताना केले.
मागील काही काळात आपल्या पक्षातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते गद्दार गटात निघून गेले. आज त्यांची तिकडे काय स्थिती आहे याकडे (Shivsena) शिवसैनिकांनी बघितले पाहिजे. अत्यंत बिकट आणि दबावाच्या परिस्थितीत गद्दार गटात हे लोकं काम करत आहे. बटिक होऊन काम करण्यापेक्षा स्वाभिमानाने जगा. हिंदूहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचार जगभरातील सर्व हिंदूच्या मनामनात आणि नसानसात असून देव, देश आणि धर्माच्या रक्षणासाठी काम करणारी शिवसेना संघटना आहे.
संघटनेचा आत्मा आणि पुनर्बांधणी या विषयावर, अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. भारतीय आणि हिंदू परंपरेत आत्मा शब्दाचा अर्थ संस्कृतीशी जोडलेला आहे. हिंदूहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आपल्यातून शरीर रूपाने गेले असले तरीही संस्कृतीच्या परंपरेनुसार त्यांचा आत्मा अजूनही आपल्यात आहे. 1966 ते 2019 पर्यंत शिवसेना राज्यात काम करत असताना गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत आपल्या विरोधात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रस्थापित सत्ता होती.
अनेक वर्ष शिवसेनेने संघर्षात काढून साखरसम्राट आणि शिक्षण सम्राटांच्या विरोधात लढाई लढून राज्यात सत्तेचे परिवर्तन करत 1995 मध्ये सत्ता खेचून आणली होती. आगामी काळातही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जोमाने संघटनात्मक कामकाज करत राज्याची सत्ता खेचून, आणू असा आशावाद दानवे यांनी व्यक्त केला. पक्षाची सत्ता येऊ किंवा न येऊ महाराष्ट्रात स्वाभिमानाचा विचार रुजवणे शिवसेनेचे काम आहे. शिवसेनाप्रमुखांचा विचार आगामी काळात पुन्हा नव्याने महाराष्ट्रातील जनतेच्या मनामनात आणि नसानसात रुजवण्यासाठी कार्य हाती घ्या, असे आवाहनही अंबादास दानवे यांनी यावेळी केले.
दरम्यान, 26 मार्च रोजी राहुरी शहरात अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत, युगपुरुष छत्रपती शिवाजी यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याची घटना घडली होती. आज अंबादास दानवे यांनी राहुरी येथे जाऊन शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची काही समाजकंटकांनी विटंबना केले असल्याने समस्त महाराष्ट्रातील मराठी जनतेच्या भावना दुखावल्या आहेत. सदरील प्रकरणी अद्यापपर्यंत कुठल्याही आरोपीला अटक झालेली नाही.
याचा निषेध म्हणून माजी मंत्री प्राजक्त तनपुरे बेमुदत आमरण उपोषणाला बसले होते. छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण महाराष्ट्राची अस्मिता असून आमच्याही या वीघातक घटनेमुळे भावना दुखावल्या आहेत. यामुळे आमरण उपोषण सोडून आंदोलन सुरूच ठेवावे, असे आवाहन आणि आग्रह करत अंबादास दानवे यांनी त्यांचे उपोषण सोडविले. पोलीस प्रशासनांने या गंभीर प्रकरणाची तातडीने दखल घेऊन पुढील 48 तासात आरोपीला अटक करावी. अन्यथा छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वाभिमान आमच्यासाठी सर्वतोपरी असून त्याच्या रक्षणासाठी महाराष्ट्र आंदोलन करू, असा इशाराही दिला.
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.