Ambadas Danve Sarkarnama
मराठवाडा

Ambadas Danve News : 'ईव्हीएम' हॅक करण्यासाठी अडीच कोटी द्या,पाहिजे तसा निकाल...; अंबादास दानवेंकडे कुणी केली मागणी?

Loksabha Election 2024 : 'संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात वापरण्यात येणारे सगळे ईव्हीएम मशीन हॅक करुन पाहिजे तसा निकाल लागेल...'

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar News : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केलेल्या एका दाव्याने खळबळ उडाली आहे. एका व्यक्तीने आपल्याला ईव्हीएम मशीन हॅक करून देतो, असे म्हणत अडीच कोटींची मागणी केल्याचा आरोप दानवे यांनी केला आहे. या संदर्भात दानवे यांनी पोलिस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली होती. यावरून पुणे पोलिसांनी एकास ताब्यात घेतल्याची माहिती आहे.

ईव्हीएम (EVM) मशीनबद्दल अनेकदा संशय व्यक्त केला जातो. या पार्श्वभूमीवर थेट विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेत्यानेच एका व्यक्तीचा हवाला देत गंभीर आरोप केल्याने या विषयाचे गांभीर्य वाढले आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनूसार मारुती ढाकणे असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून पुणे पोलिसांनी त्याला एक लाख रुपये घेताना रंगेहाथ पकडले असल्याची माहिती आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अटक करण्यात आलेला आरोपी मारुती ढाकणे हा नगर जिल्ह्यातील असल्याचे समजते. संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात वापरण्यात येणारे सगळे ईव्हीएम मशीन हॅक करुन पाहिजे तसा निकाल लागेल, असा दावा या आरोपीने केला होता. यासाठी गेल्या अनेक दिवसापासून संबंधित आरोपी आपल्याला फोन करत होता, असे अंबादास दानवे यांनी सांगितले.

शिवाय या कामासाठी अडीच कोटी रुपये द्यावे लागतील, अशी मागणीही संबंधिताने फोनवरून दानवे यांच्याकडे केली होती. निवडणूक काळात असा फोन येत असल्याने संशय आलेल्या दानवे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर संबंधित आरोपी ने केलेल्या फोनचे लोकेशन शोधत पोलिसांनी सापळा रचला.

अंबादास दानवे यांच्यामार्फत आरोपीला पैसे घेण्यासाठी बोलावले. पुण्यातील एका हॉटेलमध्ये मारुती ढाकणेला पैसे घेताना पकडण्यात आले. ईव्हीएम मशीन संदर्भात लोकांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये, यासाठी आपण खबरदारी म्हणून पोलिसांना माहिती देऊन सतर्कतेचा इशारा दिला होता. पोलिसांनी दानवे यांच्या तक्रारीची तात्काळ दखल घेतली आणि ईव्हीएम हॅक करण्याचा दावा करत अडीच कोटींची मागणी करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT