Kolhapur Lok Sabha Election 2024 : नियमांचा बट्ट्याबोळ अन् यंत्रणेचा अभाव; मतदान करतानाचे व्हिडीओ व्हायरल

Lok Sabha Election 2024 : सर्वोत्तरी यंत्रणा सज्ज झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितले आहे. पण...
kolhapur evm photo viral social media
kolhapur evm photo viral social mediasarkarnama

Kolhapur, 7 May : लोकसभा निवडणुकीतील ( Lok Sabha Election 2024 ) तिसऱ्या टप्प्यातील मतदान मंगळवारी ( 7 मे ) चुरशीने पार पडत आहे. कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात अटीतटीचे लढत होत असताना काही ठिकाणी वादाचे प्रसंग घडले आहेत.

सोशल मीडियावरून मतदान केलेले व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. असं असताना आयोगाच्या या नियमाला सोशल माध्यमावरील नेटकऱ्यांनी धाब्यावर बसवत मतदान करतानाचे व्हिडीओ सर्सास व्हायरल केले आहेत. हे व्हिडीओ महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांच्या फॅन पेजवर उघडपणे दिसत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

एकीकडे मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी निवडणूक प्रशासनाने कंबर कसली आहे. सर्वोत्तरी यंत्रणा सज्ज झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितले आहे. पण, प्रत्यक्ष मतदान केंद्रावर यंत्रणेचा अभाव दिसत आहे. येणाऱ्या मतदारांसह कर्मचाऱ्यांना देखील पाण्याची कोणतीच व्यवस्था करण्यात आली नसल्याचे दिसून येत आहे. एकीकडे मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रशासन गांभीर्याने घेऊ पाहत असताना यंत्रणेतील त्रुटी कायम आहेत.

kolhapur evm photo viral social media
Raju Shetti News : "2019 मध्ये कटकारस्थान करून माझा पराभव केला, पण...", राजू शेट्टींचं विधान

मतदान केंद्रावर मोबाईलला बंदी असताना अनेक कार्यकर्त्यांनी मतदान केंद्रावर थेट जाऊन मोबाईल चित्रण करून मतदान करणारे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत असताना प्रशासकीय यंत्रणेमध्ये अभाव दिसत आहे.


( Edited By : Akshay Sabale )

kolhapur evm photo viral social media
Kolhapur Politics: कागलकरांनो, वचपा काढण्याची संधी सोडू नका; महाडिकांनी सतेज पाटलांच्या डावपेचावर...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com