Amit Deshmukh Met Minister Ganesh Naik News Sarkarnama
मराठवाडा

Amit Deshmukh Met Ganesh Naik : विलासरावांच्या आठवणींना उजाळा अन् वनमंत्री गणेश नाईकांकडून अमित देशमुखांच्या मागण्यांना प्रतिसाद!

In a meeting with the Forest Minister, Amit Deshmukh recalls Vilasrao Deshmukh’s legacy and receives a positive response to his key demands. : भविष्यात या जमिनीचा होणारा उपयोग लक्षात घेऊन नाईक यांनी सकारात्मक प्रतिसाद देत वनविभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

Jagdish Pansare

Latur District News : लातूर शहरचे आमदार अमित देशमुख यांनी मुंबईत वनमंत्री गणेश नाईक यांची भेट घेतली. लातूर येथील विविध विकास कामा संदर्भाने निवेदन देत महसुल विभागाच्या नावावर असलेली परंतु वनविभागाच्या ताब्यात असलेली राष्ट्रीय महामार्गा लगतची मुरुड अकोला येथील जमीन राज्य व केंद्र शासनाचे क्रीडाविषयक प्रकल्प राबवण्यासाठी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी देशमुख यांनी यावेळी केली.

या भेटीत गणेश नाईक (Ganesh Naik) यांनी माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्यासोबत असलेल्या जिव्हाळ्याच्या संबंध आणि आठवणींना उजाळा दिला. राज्यात आणि देशात शैक्षणिक केंद्र म्हणून नावारूपाला आलेल्या लातूर येथील तरुण वर्ग आता क्रीडा क्षेत्रातही करिअर घडवण्याच्या संधी शोधत आहे, या तरुण वर्गाला सराव करण्यासाठी अद्यावत दर्जाची, विविध क्रीडांगणे, स्विमिंग पूल बांधता यावीत, या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट ग्राउंड उभारता यावे यासाठी सदरील जमीन उपयुक्त ठरणार आहे.

या भेटीत अमित देशमुख (Amit Deshmukh) यांनी वनमत्र्यांचे याकडे लक्ष वेधले. भविष्यात या जमिनीचा होणारा उपयोग लक्षात घेऊन नाईक यांनी सकारात्मक प्रतिसाद देत वनविभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. लातूर तालुक्यातील पेठ येथील गायरान जमीनही सध्या वन विभागाच्या ताब्यात आहे. महसूल विभागाच्या नावे असलेली मात्र सध्या वनविभागाच्या ताब्यात असलेली सदरील जमीन परत मिळावी,अशी मागणी पेठ ग्रामपंचायत व जनतेच्या वतीने सातत्याने करण्यात येत आहे.

राष्ट्रीय महामार्गालगत असलेली सदरील जमीन भविष्यात शैक्षणिक, क्रीडाविषयक किंवा शासनाचे इतर प्रकल्प उभारण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे वनविभागाने त्या जमिनीवरील ताबा सोडून ती महसूल विभागास परत करावी, अशी विनंती अमित देशमुख यांनी यावेळी केली. जमीनीच्या मालकीसंबंधी नोंदी व इतर कागदपत्रे तपासून या संदर्भात कार्यवाही करण्याच्या सूचनाही नाईक यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

शैक्षणिक, औद्योगिक व्यापारी, केंद्र म्हणून अत्यंत वेगाने विकसित होत असलेल्या लातूर शहरानजीकचे साखरा पाटील येथील विलासराव देशमुख वनउद्यान, आंतरराष्ट्रीय वन पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्याची मागणीही देशमुख यांनी नाईक यांच्याकडे केली. लातूर विमानतळाशेजारी असलेल्या या वन उद्यानात वेगवेगळ्या फुलांची उद्याने, प्राणी संग्रहालय व इतर नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून हे उद्यान विकसित करावे अशी संकल्पना असल्याचे वनमंत्रांच्या यावेळी निदर्शनास आणून दिले. या संदर्भातील प्रस्ताव आणि आराखडा तयार करण्याच्या सूचना तात्काळ नाईक यांनी दिल्या.

एकूण भूभागाच्या तुलनेत 33 टक्के वनक्षेत्र अपेक्षित असताना मराठवाड्यात ते फक्त 3 तर लातूर जिल्ह्यात एक टक्क्याहून कमी आहे. त्यामुळे या भागात वनक्षेत्र वाढवण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात यावी.लातूर आणि मराठवाडा विभागातील वनक्षेत्र वाढवण्यासाठी आपणाला काय करता येईल? याचा तात्काळ अभ्यासपूर्ण आराखडा तयार करून त्यावर अंमलबजावणी करण्यात यावी,असे निर्देश वन मंत्री नाईक यांनी संबंधितांना दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT