Amit Shah Nanded Tour News Sarkarnama
मराठवाडा

Amit Shah News : अमित शहा नांदेडमधून करणार स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा शंखनाद!

Union Home Minister Amit Shah's visit to Nanded marks BJP's beginning of its campaign for local body elections : चार महिन्यात स्थानिक स्वराज्यच्या निवडणुका घ्या, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. त्यानंतर वेगवान हालचाली सुरू झाल्या.

Jagdish Pansare

Nanded BJP News : खासदार अशोक चव्हाण यांच्या आमदार कन्या श्रीजया चव्हाण यांचा वाढदिवस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा नांदेड दौरा असा दुग्धशर्करा योग जुळवून आणण्यात आला आहे. 26 रोजी नांदेडमधील सभेतूनच शहा महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकींचा शंखनाद करणार आहेत. अशोक चव्हाण यांच्याकडून या निमित्ताने मोठे शक्ती प्रदर्शनही केले जाणार आहे.

लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर महायुतीने विधानसभा निवडणुकीत जोरदार मुसंडी मारली. 238 आमदार निवडून आणत राज्याच्या सत्तेची सगळी सुत्रं भाजपाने (BJP) आपल्या हाती ठेवली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारची वाटचाल सुरू असतांना आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत बाजी मारण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. ओबीसी आरक्षण आणि सर्वोच्च न्यायालयात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसंदर्भातील याचिका नुकत्याच निकाली काढण्यात आल्या.

चार महिन्यात स्थानिक स्वराज्यच्या निवडणुका घ्या, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. त्यानंतर वेगवान हालचाली सुरू झाल्या आणि भाजपाने तर नांदेडमध्ये 26 मे रोजी राज्यातील भाजपा खासदार, आमदार आणि पदाधिकाऱ्यांचा शंखनाद मेळावा आयोजित करत निवडणुकीचे रणशिंग फुंकण्याची तयारी केली आहे. भाजपाचे खासदार अशोक चव्हाण यांच्या आग्रहामुळे शंखनाद सभेसाठी नांदेडची निवड करण्यात आल्याची चर्चा आहे. आठ तासांच्या नांदेड दौऱ्यात अमित शहा (Amit Saha) यांच्या उपस्थितीत अनेक कार्यक्रम होणार आहेत.

सोमवार,26 मे रोजी दुपारी 1:15 वाजता श्री गुरु गोबिंदसिंघजी विमानतळ, नांदेड येथे अमित शहा यांचे आगमन होणार आहे. त्यानंतर लगेच दुपारी दीड वाजता माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचे अनावरण त्यांच्या हस्ते होईल. दुपारी पावणे दोन वाजता राज्यसभेतील खासदार डॉ. अजित गोपछडे यांच्या संपर्क कार्यालयाचे अमित शहा हे करतील. त्यानंतर नवा मोंढा मैदान येथे आयोजित शंखनाद सभेला दुपारी दोन वाजता अमित शहा मार्गदर्शन करणार आहेत.

या सभेनंतर नांदेडच्या शासकीय विश्राम गृहावर अमित शहा यांचा वेळ राखीव असणार आहे. सायंकाळी सहा वाजता महानगरप्रमुख अमर राजूरकर यांच्या नाना-नानी पार्कसमोरील भाजपा महानगर कार्यालयाचे उद्घाटन अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे. रात्री आठ वाजता अमित शहा नांदेड विमानतळावरून मुंबईकडे प्रयाण करणार आहेत. अमित शहा यांचा हा आठ तासांचा नांदेड दौरा अत्यंत महत्वाचा ठरणार आहे.

मोठे प्रवेश होणार

अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या काही आमदार आणि जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचा भाजपामध्ये प्रवेश होणार आहे. शंखनाद जाहीर सभेत हे प्रवेश होण्याची शक्यता आहे. अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतरचा हा मोठा प्रवेश सोहळा असेल, असे सांगितले जात आहे. काँग्रेसच्या दोन माजी आमदारांसह अनेकांचा यात समावेश असेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT