Lok Sabha Election Sarkarnama
मराठवाडा

Lok Sabha Election 2024 : 'मजलिस को उखाड फेको' म्हणणाऱ्या अमित शाहांना उमेदवार मिळेना; जलील यांनी डिवचलं!

Amit Shaha News : अमित शाह यांनी संभाजीनगर येथे झालेल्या जाहीर सभेत एमआयएमला उखडून फेकण्याचे आवाहन केले होते.

Jagdish Pansare

Chhatrapati Sambajinagar News : छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) लोकसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी भाजपला डिवचले आहे. 'एमआयएम को यहा से उखाड के फेकेंगे क्या, असे म्हणत आपल्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मुठी आवळायला सांगणाऱ्या भाजपने अद्याप उमेदवार का जाहीर केला नाही? एकीकडे उखडून टाकण्याची भाषा करता आणि दुसरीकडे तुम्हाला उमेदवारच मिळत नाही, असा टोलाही इम्तियाज जलील यांनी भाजपला लगावला. (Latest Marathi News)

छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाने आज चंद्रकांत खैरे यांची उमेदवारी जाहीर केली. खैरेंना उमेदवारीबद्दल शुभेच्छा देतानाच इम्तियाज यांनी भाजपवर निशाणा साधला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संभाजीनगर येथे झालेल्या जाहीर सभेत एमआयएमला उखडून फेकण्याचे आवाहन केले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

संभाजीनगरसे मोदीजी को कमळ चून के भेजोगे क्या? असेही शाह म्हणाले होते. एमआयएमला उखडून फेकण्याची शाह यांनी केलेली भाषा इम्तियाज जलील यांच्या चांगलीच जिव्हारी लागली होती. त्यामुळे भाजप कोणाला उमेदवारी देणार, याची चर्चा गेल्या दोन महिन्यापासून जिल्ह्यात सुरू आहे. एमआयएमने सर्वप्रथम इम्तियाज यांची उमेदवारी जाहीर करत आघाडी घेतली.

त्यानंतर महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) घटक पक्ष असलेल्या शिवसेना ठाकरे गटाने संभाजीनगरसह राज्यातील 16 उमेदवारांची यादी आज जाहीर केली. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत एकमेकांविरुद्ध लढलेले दोन तुल्यबळ उमेदवार पुन्हा मैदानात उतरले आहेत. महायुतीच्या उमेदवाराच्या चर्चेचे गुऱ्हाळ मात्र अद्यापही सुरूच आहे. यावरून भाजपला इम्तियाज यांनी टोला लगावत ` तुम्हाला उमेदवार जाहीर करायला एवढा वेळ का लागत आहे`, असा सवाल इम्तियाज यांनी केला.

संभाजीनगरची जागा शिवसेना शिंदे गट लढवणार? की भाजप यावर सध्या मुंबई आणि दिल्लीत बैठका सुरू आहेत. भाजपला ही जागा लढवायची आहे, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) या जागेवरचा हट्ट सोडायला तयार नाहीत. महायुतीचा उमेदवार ठरत नसल्याने इम्तियाज यांनी भाजपला डिवचण्याचा प्रयत्न केला. कोण कोणाला उखडून फेकतो, हे तुम्ही नाही, तर जनता ठरवेल, असा इशाराही त्यांनी भाजपला दिला.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT