NCP MLA Meeting : माढ्याचा तिढा अजितदादा सोडवणार; रामराजेंसह राष्ट्रवादी आमदारांची बोलावली बैठक

Madha Lok Sabha constituency : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते रामराजे नाईक निंबाळकर यांचाही रणजितसिंह निंबाळकरांच्या उमेदवारीला विरोध आहे. भाजपने माढ्यातील उमेदवार बदलावा, अशी मागणी त्यांनी केलेली आहे. भाजपने आपला उमेदवार बदलला नाही तर कमी मते पडल्यास आम्ही जबाबदार राहणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
NCP MLA Meeting : माढ्याचा तिढा अजितदादा सोडवणार; रामराजेंसह राष्ट्रवादी आमदारांची बोलावली बैठक
Published on
Updated on

Pune, 26 March : माढा लोकसभा मतदारसंघातील तिढा सोडविण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची उद्या (ता. २७ मार्च) बैठक बोलावली आहे. या बैठकीला विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासह पक्षाच्या सर्व आमदारांना निमंत्रित करण्यात आले आहे. या बैठकीत काय तोडगा निघतो आणि रामराजेंच्या नाराजीवर अजितदादा काय उपाय शोधतात, याकडे सोलापूर आणि सातारा जिल्ह्यांचे लक्ष असणार आहे.

माढा लोकसभा मतदारसंघातून ( Madha Lok Sabha constituency) खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर (RanjitShinh Naik Nimbalkar) यांच्यासह धैर्यशील मोहिते पाटील हे भाजपकडून इच्छुक होते. मात्र, पक्षाने विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनाच पुन्हा तिकीट दिले आहे, त्यामुळे मोहिते पाटील हे नाराज झाले आहेत. धैर्यशील मोहिते पाटील हे माढा मतदारसंघातील गावागावांत फिरून प्रचार करत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

NCP MLA Meeting : माढ्याचा तिढा अजितदादा सोडवणार; रामराजेंसह राष्ट्रवादी आमदारांची बोलावली बैठक
Lok Sabha Election 2024 : ‘कराड, तुमच्या तिकिटाचे फायनल झाले का?’ खैरेंना उत्सुकता...

दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रमुख नेते रामराजे नाईक निंबाळकर यांचाही रणजितसिंह निंबाळकरांच्या उमेदवारीला विरोध आहे. भाजपने (BJP) माढ्यातील (Madha) उमेदवार बदलावा, अशी मागणी त्यांनी केलेली आहे. भाजपने आपला उमेदवार बदलला नाही तर मी मते पडल्यास आम्ही जबाबदार राहणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. तसेच, रामराजे यांच्या गटाने मेळावा घेऊन आपली नाराजी बोलून दाखवली होती, त्यामुळे या बैठकीत अजितदादा ही रामराजेंची समजूत कशी काढतात आणि रामराजेही आपली तलवार म्यान करणार का, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलावलेल्या बैठकीला माढ्याचे राष्ट्रवादीचे आमदार बबनदादा शिंदे, करमाळ्याचे आमदार संजय शिंदे फलटणचे आमदार दीपक चव्हाण, रामराजे नाईक निंबाळकर हेही उपस्थित राहणार आहेत. ही बैठक उद्या पुण्यात होणार आहे.

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलावलेल्या बैठकीला माढ्याचे राष्ट्रवादीचे आमदार बबनदादा शिंदे, करमाळ्याचे आमदार संजय शिंदे फलटणचे आमदार दीपक चव्हाण, रामराजे नाईक निंबाळकर हेही उपस्थित राहणार आहेत. ही बैठक उद्या पुण्यात होणार आहे. उपमुख्यमंत्री पवार यांचा उद्या पुण्यात बैठकींचा धडाका असणार आहे. माढ्याबरोबरच ते उद्या नाशिक आणि सातारा जिल्ह्यांतील आमदार आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांसमेवत बैठक आयोजित केली आहे.

NCP MLA Meeting : माढ्याचा तिढा अजितदादा सोडवणार; रामराजेंसह राष्ट्रवादी आमदारांची बोलावली बैठक
Kolhapur Lok Sabha Constituency : महायुतीच्या 45 मधून कोल्हापूरची एक जागा निश्चित कमी होईल; शाहू महाराजांच्या विजयाचे जयंतरावांकडून भाकीत

नाशिक आणि साताऱ्यातही होणार बैठक

उपमुख्यमंत्री पवार यांचा उद्या पुण्यात बैठकींचा धडाका असणार आहे. माढ्याबरोबरच ते उद्या नाशिक आणि सातारा जिल्ह्यातील आमदार आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक आयोजित केली आहे.

R

NCP MLA Meeting : माढ्याचा तिढा अजितदादा सोडवणार; रामराजेंसह राष्ट्रवादी आमदारांची बोलावली बैठक
Solapur, Madha Loksabha : मराठा समाजाचा मोठा निर्णय; सोलापूर, माढ्यातून देणार प्रत्येकी एक तगडा उमेदवार

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com