Balasaheb Thackeray-Dhondu Patil Sarkarnama
मराठवाडा

Balasaheb Thackeray Birth Anniversary : ...अन् बाळासाहेबांनी नांदेडात केली सोन्याच्या नांगराची पूजा

Nanded Politics : एकदा मी आणि डॉ. दीपक सावंत जेवण करत होतो. तितक्यात साहेबांचा फोन आला. आम्ही तातडीने मातोश्रीवर गेलो.

Laxmikant Mule

Nanded News : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मराठवाड्याचे एक अतूट नाते होते. दुष्काळी भाग अशी ओळख असलेल्या मराठवाड्यावर बाळासाहेबांनी कायम प्रेम केले आणि मराठवाड्याच्या जनतेनेही त्यांना भरभरून यश दिले. त्यांच्या सानिध्यात आलेल्या अनेकांनी शिवसेनेचा विचार खेडोपाडी नेऊन पक्षाचा जनाधार वाढविण्यासाठी जीवाचे रान केले, त्यातीलच एक म्हणजे नांदेडचे धोंडू पाटील. (...And Balasaheb worshiped the golden plow in Nanded)

गेल्या ४० वर्षांपासून शिवसेनेचे एकनिष्ठ शिवसैनिक म्हणून ते कार्यरत आहेत. बाळासाहेबांनी डोक्यावर हात ठेवला की नवीन शक्ती व ऊर्जा मिळायची, असे सांगताना ते आठवणीत रमून गेले. माझी बाळासाहेबांशी पहिली भेट 1992 मध्ये झाली होती. कपाळावर टिळा, गळ्यात भगवा रुमाल आणि साधी राहणी ही तेव्हा माझी ओळख.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दीपक सावंत यांच्यासोबत बाळासाहेबांना भेटण्यासाठी गेले तेव्हा मला पाहून आरे हा तर अनंत तरे सारखा दिसतोय अस म्हणत त्यांनी माझे कौतुक केले. नांदेड हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. नांदेड जिल्ह्यात काँग्रेसचे वर्चस्व असतानाही शिवसेनेच्या निष्ठावंत शिवसैनिकांनी जिल्ह्यातील राजकारणात शिवसेनेचा दबदबा निर्माण केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नांदेडवर विशेष प्रेम व लक्ष होते.

या जिल्ह्याने शिवसेनेला एकावेळी चार आमदार निवडून दिलेले आहेत. राज्यात 1995 मध्ये युतीची सत्ता आल्यानंतर पहिली विराट सभा नांदेड येथे घेण्यात आली होती. शेतकऱ्यांना चांगले दिवस यावेत; म्हणून सोन्याच्या नांगराची बाळासाहेबांच्या हस्ते पुजा करण्यात आली होती. या सभेच्या तयारीची आठवण धोंडू पाटील आवर्जून सांगतात. या सभेत गडबड करणाऱ्या शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना बाळासाहेबांनी स्टेजवरून चांगलाच दम दिला होता. त्यानंतर सभा सुरळीत पार पडली होती.

मराठवाड्यात संभाजीनगरनंतर नांदेड जिल्ह्यात‌ शिवसेना वाढीसाठी जे पहिल्या फळीतील शिवसैनिक आहेत, त्यात धोंडु पाटील यांचा समावेश होतो. त्यांनी 1986 मध्ये शिवसैनिक म्हणून काम सुरू केले, ते आजही सुरूच आहे. त्यांनी नगरसेवक, विरोधी पक्षनेते, २००५ मध्ये जिल्हाप्रमुख, लातूर व बीडचे संपर्कप्रमुख आदी जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत.

धोंडू पाटील बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा देताना सांगतात की, आम्ही शिवसैनिक जेव्हा साहेबांना भेटायचो, तेव्हा ते आमची आस्थेवाईकपणे चौकशी करायचे. त्यांची भेट माझ्या जीवनाला कलाटणी देणारी ठरली. एकदा मी आणि डॉ. दीपक सावंत जेवण करत होतो. तितक्यात साहेबांचा फोन आला. आम्ही तातडीने मातोश्रीवर गेलो, साहेबांची दाढ दुखत होती. दीपक सावंत यांनी त्यांच्यावर उपचार केले. तेव्हा मला बाळासाहेबांना जवळून पाहण्याचा योग आला.

Edited By : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT