Sanjay Shirsat-Ashok Chavan News Sarkarnama
मराठवाडा

Shivsena News : अशोक चव्हाणांच्या नांदेडमध्ये पक्षवाढीचे 'शिवधनुष्य' संजय शिरसाटांना पेलवणार का?

Ashok Chavan has put forth a challenge to expand Shiv Sena in Nanded. Will Minister Sanjay Shirsat be able to take up this challenge successfully? : जिल्ह्याच्या राजकारणात सत्तेच्या चाव्या आपल्या हातात ठेवत अशोक चव्हाणांनी अधिराज्य गाजवले. अजूनही त्यांचा प्रभाव कायम आहे.

Jagdish Pansare

Marathwada Political News : महाराष्ट्रात शिवसेना अखंड होती तेव्हा मराठवाड्यातील काँग्रेसचा प्रभाव असलेल्या अनेक जिल्ह्यातही पक्षाची ताकद होती. कधी विरोधक म्हणून तर कधी थेट सत्तेत. यापैकीच एक असलेला नांदेड जिल्हा. काँग्रेसचे दिवंगत नेते शंकरराव चव्हाण आणि त्यांच्यानंतर माजी मुख्यमंत्री राहिलेले खासदार अशोक चव्हाण यांनी नांदेड जिल्ह्याची सगळी सुत्रं आपल्या हाती ठेवली. 2024 विधानसभा निवडणूक निकालावर नजर टाकली तर पक्ष बदलानंतरही अशोक चव्हाण यांनी भोकरची पारंपारिक जागा राखली.

सध्या नांदेडमध्ये (Nanded) नंबर एकचा पक्ष पाच आमदारांसह भाजपाच ठरला आहे. त्याखालोखाल तीन आमदार निवडून आणत शिवसेना शिंदे गटाने 'उबाठा'वर मात करत आम्हीच ओरिजनल असल्याचे दाखवून दिले. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला एक जागा मिळाली. जिल्ह्यातील सगळ्या नऊ जागा जिंकत महायुतीने आपली ताकद दाखवून दिली. परंतु प्रत्येक घटक पक्षाला आपापली स्वतंत्र ताकद वाढवण्याचा अधिकार असतो.

तीन आमदार निवडून आल्यानंतर आगामी महापालिका, जिल्हा परिषद व इतर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेनेने तयारी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून भाजपाच्या या बालेकिल्ल्यात संघटनात्मक ताकद वाढवण्याची जबाबदारी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्यावर संपर्कमंत्री म्हणून सोपवली आहे. जिल्ह्याच्या राजकारणात सत्तेच्या चाव्या आपल्या हातात ठेवत अशोक चव्हाणांनी अधिराज्य गाजवले. अजूनही त्यांचा प्रभाव कायम आहे.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर नांदेड जिल्ह्यात भक्कम असलेल्या या पक्षाला घरघर लागल्याचे चित्र होते. लोकसभा निवडणुकीत महायुतीचा घटक पक्ष असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला भाजपाच्या प्रताप पाटील चिखलीकर यांच्यासाठी राबावे लागले. पण सरकारविरोधातील वातावरणामुळे नांदेडच काय मराठवाडा आणि राज्यात महायुतीची वाताहत झाली. त्यानंतर सहा महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र महायुतीने दणक्यात पुनरागमन करत बहुमताने सत्ता मिळवली.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदेंची सेना सत्तेत असल्याचा या पक्षाला जिल्ह्यात मोठा फायदा होताना दिसतो आहे. मोठ्या प्रमाणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते या पक्षात प्रवेश करत आहेत. तीन आमदार असल्याने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत दमदार कामगिरी करता यावी यासाठी आता पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी मोहिम हाती घेतली आहे. मंत्री संजय शिरसाट यांची संपर्कमंत्री म्हणून नियुक्ती हा त्याचाच भाग आहे.

संजय शिरसाट यांचा राजकीय अनुभव पाहता ते नांदेडमध्ये शिवसेनेची ताकद वाढवण्यासाठीचे 'शिवधनुष्य'नक्कीच पेलतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आमदार बालाजी कल्याणकर, आनंद बोंडारकर, बाबूराव कदम, विधान परिषदेतील हेमंत पाटील या नेत्यांची साथ शिरसाट यांना लाभणार आहे. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री, छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री, राज्य प्रवक्ते असलेले शिरसाट संपर्कमंत्री म्हणून नांदेड जिल्ह्याला किती वेळ देऊ शकतील? हे पाहणेही महत्वाचे ठरणार आहे.

नांदडेमधील पक्षीय बलाबल

भोकर - श्रीजया चव्हाण विजयी (भाजप)

नांदेड उत्तर - बालाजी कल्याणकर (शिवसेना शिंदे गट)

नांदेड दक्षिण - आनंद बोंढारकर (शिवसेना शिंदे गट)

नायगाव - राजेश पवार (भाजप)

देगलूर - जितेश अंतापूरकर (भाजप)

मुखेड - तुषार राठोड (भाजप)

लोहा - प्रताप पाटील चिखलीकर (अजित पवार गट)

हातगाव - बाबूराव कदम कोहळीकर (शिवसेना शिंदे गट)

किनवट - भीमराव केराम (भाजप)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT