Ashok Chavan addressing Nanded citizens about municipal election plans and solutions for local traffic and civic issues. Sarkarnama
मराठवाडा

Ashok Chavan : 'मी नांदेड 40 वर्ष सांभाळले माझे काही....', अशोक चव्हाणांनी शिवसेनेसोबतची युती का तोडली ते स्पष्टच सांगितलं

Nanded Municipal Election 2026 : 'निवडणुकीत उमेदवारी देण्याचा जो निकष असतो तो त्याची निवडून येण्याची क्षमता किती आहे? हे बघितले जाते. मी ही उमेदवारी देताना हाच निकष डोळ्यासमोर ठेवून उमेदवार दिले आहेत. पैसे घेतल्याचे खोटे आरोप केले जात आहेत त्यात कुठलीच सत्यता नाही. भाजपमध्ये उमेदवारी देताना पक्षाच्या बहुतांश कार्यकर्त्यांना सामावून घेण्यात आले आहे.'

Jagdish Pansare

Nanded News, 02 Jan : नांदेड जिल्हा मी चाळीस वर्षे सांभाळला आहे. इथली सामाजिक, राजकीय आणि भौगोलिक परिस्थिती मला चांगलीत माहिती आहे. शहरातील प्रश्न, रस्त्यांची समस्या, वाहतूक कोंडी या सगळ्या गोष्टींवर आम्ही उपायोजना करत आहोत.

महापालिका निवडणुकीसाठीच्या जाहीरनाम्यात नांदेडकरांना आम्ही या सगळ्या गोष्टींचा शब्द देत आहोत, असे खासदार अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. नांदेड महापालिका निवडणुकीत शिवसेनेसोबतची युती तोडल्याचे खापर अशोक चव्हाण यांच्या माथी फोडले जात आहे. आपण शिवसेनेसोबत युती का केली नाही? याचेही कारण आज त्यांनी स्पष्ट केले.

शिवसेनेला आम्ही आठ ते दहा जागा देवू केल्या होत्या. मात्र त्यांना 25 ते 30 जागा हव्या होत्या, ज्या देणे शक्य नव्हते आणि म्हणून शिवसेनेसोबत आमची युती होऊ शकली नाही. नगरपालिका निवडणुकीत निश्चितच शिवसेनेची ताकद वाढली असेल, म्हणून त्यांच्या अपेक्षा वाढणे साहजिक आहे.

पण 25- 30 जागा त्यांना दिल्या असत्या तर मग आमच्या भाजपच्या कार्यकर्त्यांना कोणत्या जागा द्यायच्या? हा प्रश्न होता. त्यामुळे आमची युती होऊ शकली नाही, असे अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले. भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. अनेक डावलेल्या उमेदवारांनी तुमच्यावर पैसे घेऊन तिकीट वाटप केल्याचा आरोप केला आहे. या संदर्भात प्रश्न केला असता कुठेही कोणाकडून आम्ही पैसे घेतलेले नाही.

निवडणुकीत उमेदवारी देण्याचा जो निकष असतो तो त्याची निवडून येण्याची क्षमता किती आहे? हे बघितले जाते. मी ही उमेदवारी देताना हाच निकष डोळ्यासमोर ठेवून उमेदवार दिले आहेत. पैसे घेतल्याचे खोटे आरोप केले जात आहेत त्यात कुठलीच सत्यता नाही. भाजपमध्ये उमेदवारी देताना पक्षाच्या बहुतांश कार्यकर्त्यांना सामावून घेण्यात आले आहे.

साहजिकच आहे सगळ्यांना न्याय देता येत नाही आणि मग त्यातून हे असे नाराजी नाट्य आणि आरोप केले जातात. हे केवळ भाजपमध्येच नाही तर सर्वच राजकीय पक्षांमध्ये होत असते असेही अशोक चव्हाण यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर हे सातत्याने तुमच्यावर आरोप करतात, याकडे लक्ष वेधले असता कोण प्रताप पाटील? मला माहित नाही असे म्हणत अशोक चव्हाण यांनी यावर भाष्य करणे टाळले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT