Ashok Chavan Sarkarnama
मराठवाडा

Chavan Grand Welcome in Nanded : चव्हाणांचे भाजपमध्ये नवे ‘अशोक पर्व’; नांदेडमध्ये स्वागताला काँग्रेस पदाधिकारीही हजर...

BJP News : चव्हाणांच्या समर्थकांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत अशोकरावांचे नांदेडमध्ये स्वागत केले.

Laxmikant Mule

Nanded News : राज्यातील राजकारणात भूकंप घडवून आणनारे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांचे नांदेड या कर्मभूमीत शुक्रवारी (ता २३) दुपारी आगमन झाले. भाजपत गेल्यानंतर नांदेड शहरातील हे त्यांचे पहिलेच आगमन, त्यामुळे चव्हाणांच्या समर्थकांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत अशोकरावांचे स्वागत केले. भाजपमधील त्यांच्या नव्या अशोक पर्वाला सुरुवात झाली आहे. त्यांचे ‘जय श्रीराम, भारत माता की जय, वंदे मातरम’च्या घोषणांनी स्वागत करण्यात आले. ढोलताशे, फटाक्यांची आतषबाजी करून स्वागत करण्यात आले. शहरातून उघड्या जीपमधून मिरवणूक काढण्यात आली (Ashok Chavan News)

राज्यातील आणि देशातील राजकारणात दिवंगत डॉ. शंकरराव चव्हाण यांचे नाव आदराने घेतले जाते. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दहा दिवसांपूर्वी भाजपत प्रवेश केल्यानंतर नांदेड जिल्ह्यातील राजकारणाला कलाटणी मिळाली आहे. भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर खासदार अशोक चव्हाण यांचे प्रथमच नांदेडमध्ये आगमन झाले. या निमित्ताने त्यांच्या समर्थकांनी विमानतळ परिसर आणि शिवाजीनगर परिसरात असलेल्या निवासस्थानी गर्दी केली होती. त्यांच्या स्वागताला नांदेड शहर व जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनीही गर्दी केली होती. (Marathi Political News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नांदेड विमानतळावर माजी आमदार अमरनाथ राजूरकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, डॉ मीनल पाटील खतगावकर, दिलीप कंदकुर्ते, प्रवीण साले, डॉ संतुकराव हंबर्डे, प्रवीण पाटील-चिखलीकर, किशोर देशमुख, संजय देशमुख लहानकर आदींनी स्वागत केले. (maharashtra Political News)

नांदेडच्या विमानतळावर गर्दी झाल्याने पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाली. पोलिसांनी गर्दीला आटोक्यात आणण्यासाठी सौम्य लाठीमारही केला. नांदेड विमानतळापासून अशोक चव्हाण यांच्या शिवाजीनगरमधील निवास स्थानापर्यंत रॅली काढण्यात आली. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गळ्यात पक्षाचा दुप्पटे घातले होते, तर अशोक चव्हाण यांच्या समर्थकांनी दुप्पटे घालणे टाळले.

काँग्रेसचे पक्ष निरीक्षक माजी मंत्री शिवाजीराव मोघे, अनिल पटेल काही दिवसांपूर्वी नांदेडला आले होते. या निरीक्षकांनी अशोक चव्हाण यांच्यासोबत कोणी गेले नाही, असा दावा केला होता. पण, आज झालेली गर्दी पाहता नांदेड जिल्ह्यातील काँग्रेस अशोक चव्हाण यांच्या सोबत असल्याचे दिसून आले.

Edited By : vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT