Balasaheb Thorat  Sarkarnama
मराठवाडा

Phulambri Assembly Constituency : महायुतीला बहीण नव्हे, सत्ता लाडकी

Congress leader Balasaheb Thorat criticized the Grand Alliance : विलास औताडे हे पक्षाच्या कठीण काळात दोनवेळा लोकसभा निवडणूक लढले. त्यांनी फुलंब्री मतदारसंघामध्ये अत्यंत चांगले प्रतिनिधित्व केलेले आहे.

Jagdish Pansare

Maharashtra Assembly Election 2024 : महायुती सरकार हे खोक्याचा वापर करून सत्तेत आले. आता निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी लाडकी बहीण योजना आणली. मात्र, त्यांना सत्ता लाडकी आहे. त्यामुळे काँग्रेसला अडचणीच्या काळात साथ देणाऱ्या महाविकास आघाडीचे उमेदवार विलास औताडे यांना निवडून आणा, असे आवाहन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

महाविकास आघाडीचे उमेदवार विलास औताडे यांच्या प्रचारार्थ सोमवारी (ता.11) मुकुंदवाडी येथील सभेत ते बोलत होते. (Balasaheb Thorat) व्यासपीठावर राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार डॉ. कल्याण काळे, विलास औताडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

विलास औताडे हे पक्षाच्या कठीण काळात दोनवेळा लोकसभा निवडणूक लढले. त्यांनी फुलंब्री मतदारसंघामध्ये अत्यंत चांगले प्रतिनिधित्व केलेले आहे. (Congress) काँग्रेस सेवा दलाच्या माध्यमातून राज्यात त्यांनी चांगले काम केले. सध्याचे महायुती सरकार भ्रष्टाचारी असून, 70 हजार कोटींचा घोटाळा करणारे त्यांनी सोबत घेतले.

त्यांच्यासोबत जे गेले ते स्वच्छ झाले, अशी टीका थोरात यांनी यावेळी केली. यावेळी शंकर ठोंबरे, सुरेखा गाडे, कमलाकर जगताप, नाना पळसकर, किरण डोणगावकर, मोतीलाल जगताप व बाबासाहेब डांगे आदींसह महाविकास आघाडीच्या कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

विधानसभेची निवडणूक राज्यासाठी महत्त्वाची आहे. शेतकऱ्यांच्या समस्या, युवक, महिलांच्या समस्यांकडे महायुती सरकारने लक्ष दिले नाही. अनेक आश्वासने दिली जातात; मात्र ती पाळले जात नाहीत. संविधानात सर्वांना समान अधिकार आहेत. त्यालाच विरोध होत आहे.

भाजपविरोधातील लोकांना ईडी, पोलिस यांच्या माध्यमातून बदनाम केले जाते. त्यामुळे या निवडणुकीत महाविकास आघाडी सरकार येणार असून, विलास औताडे यांना निवडून द्या, असे आवाहन काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT