Balasaheb Thorat News : विधानसभा निवडणुकीत 'मविआ' किती जागा जिंकणार; थोरातांनी थेट आकडाच सांगितला

Political News : काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी देखील महाविकास आघाडी विधानसभा निवडणुकीत किती जागा जिंकणार हे सांगितले.
Balasaheb Thorat
Balasaheb ThoratSarkarnama
Published on
Updated on

Pune News : आगामी विधानसभा निवडणुकीत आपला पक्ष किती जागा जिंकणार याबाबत सर्वच राजकीय पक्ष दावे प्रति दावे करत आहेत. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी देखील महाविकास आघाडी विधानसभा निवडणुकीत किती जागा जिंकणार हे सांगितले.

पत्रकार परिषदेत बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले, '20 तारखेला निवडणुक होत आहे. महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र सामोरे जात आहोत. या निवडणुकीत आम्ही जनतेला 5 गॅरंटी दिल्या आहेत. या माध्यमातून महिलांना, शेतकऱ्याना, युवकांना योजना दिल्या आहेत. आरक्षणासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.

काँग्रेस (Congress) फसवणूक करत असल्याचा आरोप झाला. काही वर्तमान पत्रात आमची बदनामी केली. आम्ही त्या विरोधात तक्रार केली आहे. आमची जी जाहिरात चुकीचे म्हटली जात आहे. त्याबद्दल आम्ही उद्या मुंबई येथे पत्रकार परिषद घेणार आहोत. अनेक लोक भ्रष्टाचार करून सत्तेत बसले आहेत. यांच्यावर महाराष्ट्राच्या जनतेचा राग असल्याचे त्यांनी सांगितले.

जनतेला हे महायुतीचं सरकार मान्य नाही. फोडाफोडीचे राजकारण करून पक्षांतर बंदीच्या कायद्याचे मोडतोड यांनी केली आहे. तसेच स्वायत्त संस्थेचा या सरकारने गैरवापर यांनी केला आहे. याबाबत जनतेत मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. राज्यातील महिलांच्या युवकांच्या आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारने दुर्लक्ष केलं जातं आहे. त्यामुळे जनता महाविकास आघाडीला मोठ्या संख्येने विजयी करणार आहे. (Balasaheb Thorat News)

Balasaheb Thorat
Amit Deshmukh: 'मुझको राणाजी माफ करना' असे भरसभेत अमित देशमुख का म्हणाले ?

राज्याची आर्थिक शिस्त अर्थमंत्री अजित पवार यांच्यामुळे कोलमडली आहे. सरकारमधील आमदार आणि विरोधातील आमदारांमध्ये निधी वाटपामध्ये भेदभाव करण्यात आला आहे. यापूर्वी सभागृहात कधी होत नव्हते. सरकारच्या धोरणांमुळे अर्थव्यवस्था अडचणीत आली आहे. या सर्व गोष्टींना लगाम घालण्याचे काम आम्ही सत्तेत आल्यावर करणार असल्याचा थोरात यांनी सांगितले.

आताच्या अर्थमंत्र्यांच्या कारभारामुळे अर्थ खात्याचा बोजवारा उडाला आहे. जनतेचे हाल यांनी केले आहेत. जाहिरातीसाठी वायफळ खर्च केला गेला. सध्याचे अर्थमंत्री अत्यंत बेशिस्तपणे अर्थखात चालवत होते, अशी टीका बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी केली.

Balasaheb Thorat
OBC Politics : विधानसभा निवडणुकीत ओबीसी मतदार ठरणार 'गेम चेंजर' ? कुठल्या पक्षाला देणार कौल

काँग्रेसमधील बंडखोरीबाबत बोलताना थोरात म्हणाले, बंडखोरी फक्त महाविकास आघाडीत नसून ती महायुतीमध्ये देखील आहे. कितीही बंडखोरी झाली तरी महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे. बंडखोरांची अद्यापही संवाद साधत असून त्यांच्यावर कारवाई नक्की करणार आहोत. आम्ही बंडखोरी थांबवण्याचे खूप प्रयत्न केले. आम्ही कुठं कमी पडलो नाही. सगळ्यांबरोबर बोलून समजूत काढण्याचा प्रयत्न केला तर काही प्रमाणात आम्हाला यश आले नाही.

महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल ? याबाबत बोलताना थोरात म्हणाले, आमच्या पुढं उद्दिष्ट वेगळी आहेत. महाविकास आघाडी म्हणून एकत्र आलो आहेत. मुख्यमंत्रीपदाचा चेहरा महत्त्वाचा नाही. लोकसभेला ज्याप्रमाणे यश मिळाले त्याप्रमाणे विधानसभेला आपण यश मिळवून महाराष्ट्राची सत्ता मिळवायची हे आमचे उद्दिष्ट असून आम्ही या निवडणुकीत 180 जागा जिंकू असा विश्वास बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.

Balasaheb Thorat
Poonam Mahajan : प्रमोद महाजन यांच्या हत्येमागे षडयंत्र? पूनम महाजन काय म्हणाल्या....

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com