Bhausaheb Andhalkar Sarkarnama
मराठवाडा

Vanchit Candidate : ‘वंचित’कडून धाराशिवच्या आखाड्यात उतरलेले बार्शीचे आंधळकर कोणाची अडचण करणार?

Lok Sabha Election 2024 : भाऊसाहेब आंधळकर हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील बार्शीचे रहिवासी आहेत. बार्शी मतदारसंघ हा धाराशिव लोकसभा मतदारसंघाला जोडलेला आहे. त्यामुळे बार्शीतील आंधळकर यांना वंचित बहुजन आघाडीने धाराशिव लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.

Vijaykumar Dudhale

Solapur, 12 April : वंचित बहुजन आघाडीने उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली असून धाराशिव लोकसभा मतदारसंघातून माजी पोलिस निरीक्षक तथा शिंदेंंच्या शिवसेनेचे भाऊसाहेब आंधळकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. धाराशिव लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून ठाकरेंच्या शिवसेनेचे विद्यमान खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, तर महायुतीकडून अर्चना पाटील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आता वंचित आघाडीकडून आंधळकर यांची एन्ट्री झाली आहे.

भाऊसाहेब आंधळकर (Bhausaheb Andhalkar) हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील बार्शीचे (Barshi) रहिवासी आहेत. बार्शी मतदारसंघ हा धाराशिव लोकसभा मतदारसंघाला (Dharashiv Lok Sabha Constituency) जोडलेला आहे. त्यामुळे बार्शीतील आंधळकर यांना वंचित बहुजन आघाडीने धाराशिव लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. आंधळकर हे महायुतीमधील शिंदे यांच्या शिवसेनेत होते. महायुतीकडून ते धाराशिवमधून निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक हेाते. मात्र, महायुतीने राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना उमेदवारी दिली, त्यामुळे आंधळकर यांनी गुरुवारी (ता. 11 एप्रिल) वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

धाराशिव लोकसभा मतदारसंघातून आतापर्यंतच्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला लीड मिळाले आहे. बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत हे भाजप पुरस्कृत आहेत, त्यामुळे राऊत हे आपली ताकद महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे करतील, अशी शक्यता आहे. अर्चना पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळाल्यामुळे शिवसेनेचे नेते नाराज झाले आहेत. आंधळकर ज्या समाजातून येतात, त्यांची संख्या बार्शी शहर आणि तालुक्यात मोठी आहे. तसेच, धाराशिवमध्ये तो समाज मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे आंधळकर कोणाची मते खाणार, याची उत्सुकता आहे.

पोलिस खात्यातून सेवानिवृत्ती घेतल्यानंतर भाऊसाहेब आंधळकर यांनी 2011 मध्ये शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र, एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतर आंधळकर यांनीही ठाकरेंची साथ सोडत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. ते धाराशिव लोकसभेची निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक होते. मात्र, ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला गेल्यानंतर त्यांनी नाराजी व्यक्त केली हेाती, त्यातूनच त्यांनी वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली होती. त्यानंतर आंधळकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

भाऊसाहेब आंधळकर हे वरिष्ठ पोलिस निरीक्षक होते. पोलिस दलात असतानाही ते वादग्रस्त ठरले होते. विशेषतः त्यांचा विधान परिषदेचे माजी उपसभापती वसंत डावखरे यांच्यासोबत झालेला वाद विशेष गाजला होता. आंधळकर हे कायम वादग्रस्त व्यक्तीमत्व ठरलेले आहे. शिवसेनेतही त्यांची एक आक्रमक नेता म्हणून ओळख होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT